आज दिनांक 22/09/2023 रोजी ११:३० ते १३:३० वां दरम्यान बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील बेलवंडी गावातील सर्व गणेश मंडळे,गावातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी यांची गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने बेलवांदी पोलीस स्टेशन येथे मीटिंग घेतली.
सदर मीटिंग दरम्यान सर्व गणेश मंडळाच्या प्रतिनिधींनी गणेश विसर्जन मिरवणूक ही डीजे विरहित करण्याचा निर्णय घेतला.
तसेच बेलवंडीतील सर्व गणेश मंडळ , ‘एक गाव एक विसर्जन मिरवणूक – dj विरहित’ हा उपक्रम राबविणार असल्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. सदर एक गाव एक मिरवणुकी करिता डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य -ढोल ताशा , लेझीम , हलगी , बँड तथा टाळ मृदुंग वाजवून एक आदर्श गणपती विसर्जन मिरवणूक करण्याचा व मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त माता भगिनींना प्राधान्य देण्याचा व पारंपारिक वाद्य व पारंपारिक पोशाख परिधान करून मिरवणूक काढण्याचा निर्णय बेलवंडी गावातील गणेश मंडळांनी व ग्रामस्थांनी घेतला.
सदर निर्णयाचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे बेलवंडी पोलीस स्टेशन यांनी स्वागत करून जिल्ह्यामध्ये बेलवंडीचा ‘dj विरहित एक गाव एक मिरवणूक ‘ चा आदर्श प्रस्थापित व्हावा अशा शुभेच्छा दिल्या.
बेलवंडी पोलीस, ग्रामस्थ आणि गणेश मंडळ यांचा स्तुत्य उपक्रम
बेलवंडी गावातील गणेश मंडळांचा DJ विरहित विसर्जन मिरवणुकीचा निर्धार, मिरवणुकीत असणार महिलांचा पुढाकार