अहमदनगर बातम्याश्रीगोंदा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी ३३ उमेदवार आजमावणार नशीब

श्रीगोंदा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी ३३ उमेदवार आजमावणार नशीब

spot_img
spot_img

ग्रामपंचायत निवडणूक:घुटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध. 

 

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींपैकी घुटेवाडीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. सरपंचपदाच्या ९ जागांसाठी ३३, तर सदस्यपदाच्या ९४ जागांसाठी २४३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. श्रीगोंदा तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली.

लोणी व्यंकनाथमध्ये सरपंचपदासाठी मनीषा बाळासाहेब नाहाटा यांच्याविरोधात प्रतिभा लखन नगरे मैदानात उतरल्या आहेत. सदस्यपदाच्या १७ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. आधोरेवाडीत सरपंचपदासाठी महेश कोथिंबिरे विरुद्ध अजित लकडे यांच्यात सरळ सामना आहे; तर ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत.

मढेवडगावमध्ये सरपंचपदासाठी फुलसिंग मांडे, संग्राम शिंदे, प्रमोद शिंदे, भाऊसाहेब मांडे, अर्जुन गोरे यांच्यात लढत सदस्यपदाच्या १३ जागांसाठी ३८उमेदवार आहेत. देवदैठणमध्ये जयश्री गुंजाळ व सुनीता वाघमारे यांच्यात सरळ सामना, तर सदस्यपदासाठी ११ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. आनंदवाडीत

सरपंचपदासाठी सीमा खामकर, सुनंदा यादव, छाया ढमढेरे, कमल नलवडे, मंदा वाघ सदस्यपदाच्या ११ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. सविता बर्डे, वृषाली खरात बिनविरोध निवडून आले आहेत.

टाकळी लोणार सरपंचपदासाठी मीना मते, अर्चना दरवडे, ज्योती पुनगर, कल्याणी खरात यांच्यात चौरंगी लढत आहे. सदस्य पदाच्या १० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सुनील जगदाळे बिनविरोध निवडून आले आहेत.

विसापूर सरपंच पदासाठी रूपाली जठार, शीतल जठार, अश्विनी शिंदे, योजना जठार आहेत. सदस्यपदासाठी आठ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहे.

 

घुटेवाडी ग्रामस्थांनी गावाला दोन ट्रॅक्टर आणि एक पिठाची गिरणी घेण्यासाठी निवडणूक बिनविरोध केली आहे. सरपंचपदी गोविंद घुटे तर सदस्यपदी बाबासाहेब गव्हाणे, पूजा गव्हाणे, रुपाली घुटे, सुरेखा घुटे, बापू घुटे, अलका लोखंडे, योगेश दारकुंडे बिनविरोध निवडून आले आहेत.

कोळगावमध्ये सरपंचपदासाठी माजी सभापती पुरुषोत्तम लगड, हेमंत नलगे, संपत शिरसाठ, विलास मेहत्रे, शैलेंद्र पंडित मैदानात उतरले आहेत. १७ जागांसाठी ४५ उमेदवार मैदानात उतरले आहेत. पेडगावमध्ये सरपंचपदासाठी भगवान कणसे, सुनील खेडेकर, इरफान पिरजादे, नितीन घोडके, तर सदस्यपदाच्या १३ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

अर्ज माघारी घेतल्यानंतर आता गावागावातील निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता उमेदवारांचा प्रचार सुरु होणार आहे

लेटेस्ट न्यूज़