ताज्या बातम्याडॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात तृतीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात तृतीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

spot_img
spot_img

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात तृतीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

नगर दि.१ जानेवारी २०२५

आरोग्य क्षेत्रात होणाऱ्या जलद गती बदलामुळे परिचारिका क्षेत्रामध्ये सार्वभौम, सशक्त व मजबूत नेतृत्वाची गरज भासत आहे. परिचर्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेतृत्वांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या आव्हानांवर नेहमी मात करावी लागते. आरोग्य क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा परिणाम हा परिचर्या क्षेत्राच्या नेतृत्वामध्ये बदल घडून आणण्यास कारणीभूत आहेत. आरोग्य सेवा प्रणालीवरील ताण आणि आरोग्यासंदर्भातील जागतिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी परिचारिका क्षेत्रामध्ये सार्वभौम सक्षम असे नेतृत्व तयार होणे गरजेचे आहे, ज्यामुळे परिचर्या क्षेत्राचे भविष्य हे उज्वल होऊ शकेल. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचार्या महाविद्यालयाने २० वर्षा चा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केला असून यानिमित्ताने महाविद्यालयात “सक्षम सार्वभौम नेतृत्व तयार करून परिचर्या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल करणे” या विषयावर दिनांक २८ डिसेंबर२०२४ रोजी तृतीय आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.

परिषदेची सुरुवात माझी पंतप्रधान स्वर्गीय डॉ.मनमोहन सिंग, यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली. परिषदेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय डॉ . एम . प्रकासम्मा , या होत्या. सदार परिषदेसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय सौ. शालिनीताई विखे पाटील आणि डॉ.नीलिमा सोनवणे, अतिरिक्त नर्सिंग संचालक, आरोग्य आयुक्तालय, मुंबई कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मा . वसंतराव कापरे, विश्वस्थ डॉ . विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन , डॉ . पी . एम. गायकवाड ,संस्थेचे प्रभारी सेक्रेटरी, प्रा. डॉ. अभिजीत दिवटे,संचालक (वैद्यकीय), डॉ.रामचंद्र पडळकर मुख्य प्रशासकीय अधिकारी या परिषदेकरिता उपस्थित होते.

नेतृत्व हे केवळ ज्ञान आणि कौशल्यांपुरते मर्यादित नाही, तर ते नैतिकता, करुणा आणि सहकार्य या मूल्यांवर आधारित असले पाहिजे असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी मांडले.

या संमेलनाद्वारे आपण नर्सिंग क्षेत्राच्या नेतृत्वाला नवी दिशा देणार आहोत. मला विश्वास आहे की, आपल्या विचारांची देवाणघेवाण ,सार्थक संवाद ,सर्वांचे सक्रिय योगदान यातून एक स्थिर आणि सर्वसमावेशक नेतृत्व विकसित होईल असा विश्वास माननीय डॉ . एम . प्रकासम्मा यांनी व्यक्त केला .

 

डॉ. जॉय पायपर, सहाय्यक प्राध्यापक ग्राउंड कॉलेज, संयुक्त राज्य अमेरिका (यु.एस.ए.) यांनी परिचर्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण क्षमतेचे नेतृत्व तयार करून परिचारिका सेवेचा दर्जा उंचावणे’ या विषयावर आपले मत मांडले.

“भविष्यातील नेतृत्व : परिचर्या क्षेत्रातील नेतृत्वाचे सक्षमीकरण ” या विषयावर बोलताना ,डॉ. सुवरेश नरुला खन्ना, प्राध्यापक व संस्थापक इमिरियट्स पेट्रोन, न्यूयॉर्क (अमेरिका) म्हणालया कि ,आपल्याला असे नेतृत्व विकसित करावे लागेल जे नैसर्गिक असून आपल्या प्रयत्नांतून आणि दृष्टिकोनातून निर्माण होईल.

“अनुकरणीय सार्वभौम नेतृत्व तयार करून परिचर्या क्षेत्रात नेतृत्व उंचावणे” यावर बोलताना विविध आव्हाने आणि संकटांना सामोरे जाताना आपल्याला उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता ,मानसिक दृढता ,संवेदनशीलता या गुणांची आवश्यकता असते असे डॉ. नानसी डायस, सहाय्यक प्राध्यापक, पश्चिम कॅरोलीना विद्यापीठ यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल हॉस्पिटल च्या संचालक डॉ.फलाक्षी मांजरेकर यांनी ‘सशक्त नेतृत्व तयार करणे ‘परिचारिका क्षेत्रात नेतृत्वाचे भविष्य: आव्हान आणि संधी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ.शोभा गायकवाड, सहाय्यक प्राध्यापक एसएनडीटी परिचर्या महाविद्यालय, महिला विद्यापीठ मुंबई यात सहभागी होत आहेत. तसेच या चर्चासत्रामध्ये सौ.ग्रेसी मथाई, सीओ बेबी मेमोरिअल हॉस्पिटल कालिकत,केरळ ,डॉ.नीलिमा सोनवणे, अतिरिक्त नर्सिंग संचालक, आरोग्य आयुक्तालय, मुंबई, महाराष्ट्र, डॉ.अजिता नायर,मॅनेजिंग डायरेक्टर हेल्थ बीज हेल्थकेअर मॅनेजमेंट.सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि डॉ. पर्ल क्रूज,लीड हेमेटॉलॉजी रिसर्च. क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल ,आयएनएच इंग्लंड ,यांनी सभाग घेतला आणि आपले मत व्यक्त केले.

या परिषदेचा ७४६ शिक्षक, परिचारिका व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला . या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कतार , यू . एस. , यू. के .,राजस्थान , गुजरात इ. ठिकाणाहून अनेक सदस्यांची सहभाग घेतला व ६२ विद्यार्थी व शिक्षकांनी आपले शोध निबंध सादर केले. सर्वात्कृष्ट शोध निबंध सादर करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

 

आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे प्रा. डॉ. अभिजीत दिवटे,संचालक (वैद्यकीय) यांचे मार्गदर्शन लाभले .

संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.रामचंद्र पडोळकर आणि प्रा. डॉ. प्रतिभा चांदेकर, प्राचार्या, परिचार्या महाविद्यालय यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले .

 

भारतीय परिचर्या परिषदेकडून १ तर महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडून २ क्रेडिट पॉईंट देण्यात आले. महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडून श्री. पंकज काळे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहीले तसेच श्रीमती. आग्नेस अरुण स्वामी , यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, या विद्यापीठाकडून निरीक्षक म्हणून काम पाहीले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये परिचर्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांनी आपली मते मांडली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी यशस्वीरित्या परिषदेच्या आयोजनाबद्दल कौतुक केले . प्रा. अमोल टेमकर , परिषदेचे आयोजक , यांनी आभार प्रदर्शन केले .या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी परिचर्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

लेटेस्ट न्यूज़