Friday, December 20, 2024

आ.शिंदे व आ.पाचपुते या यांच्या मध्ये तब्बल 40 मिनिटे बंद दाराआड चर्चा…

आमदार प्रा.राम शिंदे यांनी घेतली आ. बबनराव पाचपुते यांची सदिच्छा भेट !

श्रीगोंदा दि.27 जानेवारी 2024

अहमदनगर जिल्ह्याचे जेष्ठ नेते तथा श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांची आमदार प्रा राम शिंदे यांनी आज 26 जानेवारी 2014 रोजी सदिच्छा भेट घेतली. पाचपुते यांच्या निवासस्थानी दोन्ही माजी पालकमंत्र्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे प्रदीर्घ चर्चा झाली.

 

आमदार प्रा राम शिंदे हे आज 26 जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुका दौर्‍यावर होते. या दौर्‍यात ते एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. तत्पुर्वी आमदार प्रा.राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे जेष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते यांची सदिच्छा भेट घेतली. पाचपुते कुटूंबियांनी आमदार प्रा राम शिंदे यांचा यथोचित सन्मान करत स्वागत केले. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

 

या सदिच्छा भेटीत आमदार प्रा.राम शिंदे व आमदार बबनराव पाचपुते या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे प्रदीर्घ चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला. शिंदे व पाचपुते हे दोन्ही नेते अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत. दोन्ही माजी पालकमंत्र्यांमध्ये आज प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीचा सविस्तर तपशील समजू शकला नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या