अहमदनगर बातम्यालोकप्रतिनिधींच्या कार्याचे समाजाने कौतुक केल्यास काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळते –खा.डॉ.सुजय विखे...

लोकप्रतिनिधींच्या कार्याचे समाजाने कौतुक केल्यास काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळते –खा.डॉ.सुजय विखे पाटील

spot_img
spot_img

 

तिसगांव येथे व्यापारी संघटनांकडून आयोजित केलेल्या सत्कार समारंभात खासदार सुजय विखे यांची उपस्थिती

लोकप्रतिंनिधीनीं केलेल्या कामाचे कौतुक हे समाजाने केल्यास, अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते. आजच्या या सत्काराने आपण खूप भारावून गेलो असून कौतुकाची ही थाप जवाबदारी वाढवीत असल्याचे खा. डॉ.सुजय विखे यांनी तिसगांव येथील व्यापारी संघटनेने केलेल्या सत्कारास उत्तर देताना संगितले. करंजी नगर-पाथर्डी मार्गे जाणारा कल्याण – विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते, हे काम पूर्ण करण्यासाठी मोठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली, या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, ही माझी प्रामाणिक इच्छा होती, विकासकामे मार्गी लावण्यासाठी इच्छाशक्ती देखील असावी लागते आणि माझ्या कार्यकाळात हा रस्ता पूर्णत्वास आला, याचे मला मोठे समाधान असल्याचे त्यांनी यावेळी संगितले.

 

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे व्यापारी संघटनेच्या वतीने खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.मोनिकाताई राजळे यांच्या सत्कारचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले की मी नागरिकांच्या संपर्कात कमी पडत असलो तरी विकास कामात कुठेही कमी पडणारा नाही. नगर शहराचा उड्डाणपूल पूर्ण केला म्हणूनच दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी नगर शहरातील वाहतूक उड्डाणपुलामुळे सुरळीत सुरू राहिली. विकास कामे करताना दोन पाच लोक नाराज झाले तरी चालतील परंतु हजारो लोक या रस्त्याच्या कामामुळे समाधानी असल्याचे दिसून येत आहे.तिसगाव येथील अतिक्रमणे हटवण्यासाठी थोडा कटू निर्णय घ्यावा लागला होता . मराठवाडीपासून पुढे जांबकौडगाव, मेहेकरी या रस्त्याच्या कामासाठी आणखी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाले असून हा रास्ता देखील लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

 

प्रारंभी सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या गणपतीची महाआरती खा. विखे पाटील व आ. मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

 

या वेळी सोमनाथ वांढेकर, बाळासाहेब गुगळे देविदास माने, बाळासाहेब म्हस्के, गजानन विधाते, महेश लोखंडे सर यांच्यासह कार्यकर्ते , ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज़