अहमदाबाद दि.16 ऑक्टोबर 2023
आयपीएल मधील लढतींनाही बुमराहने दिले, विजयाचे श्रेय
लहान वयात अहमदाबाद मध्ये भरपूर क्रिकेट खेळण्याचा फायदा पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात झाला, असे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने म्हटले आहे. शनिवारी बुमराहने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध १९ धावांत दोन गडी बाद करत भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला.
बुमराह या मैदानावर भरपूर स्पर्धात्मक क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे ही खेळपट्टी समजून घेण्यास मदत झाली, असेही तो म्हणाला. सामनावीर बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी फलंदाजीस सोप्या खेळपट्टीवर पाकिस्तानला १९१ धावांत गुंडाळले. बीसीसीआयच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बुमराहने हार्दिक पांड्याला सांगितले की, मी या मैदानावर ज्युनियर क्रिकेट भरपूर खेळलो आहे. ही एक सपाट खेळपट्टी होती. त्यामुळे मी त्या अनुभवाचा येथे वापर केला. चार चौकार गेल्यानंतरच खेळपट्टी ओळखणे गरजेचे आहे. मी तेच करत होतो. या चर्चेदरम्यान बुमराहने आहे. दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्धही प्रभावी गोलंदाजी केल्याचे मोहम्मद सिराजने सांगितले. बुमराहने आपल्या यशाचे श्रेय या ठिकाणी आयपीएलमधील सामन्यांना दिले आहे.
तो म्हणाला की, मी आयपीएलमधील अनुभावाचा वापर करण्याचाही प्रयत्न आयपीएलमध्ये आम्ही केला. सपाट खेळपट्ट्यांवर खूप गोलंदाजी करतो.पांड्याने गोलंदाजी करताना आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदलाचे श्रेय बुमराहला देताना सांगितले की, माझ्या एका चेंडूवर चौकार गेला तर मी पुढचा चेंडू संथ टाकतो. बुमराह हा महान गोलंदाज सिराज म्हणाला की, पाकिस्तानविरुद्ध माझा पहिलाच सामना असल्यामुळे मी दबावात होतो. पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्लाह शफीक याला बाद करण्याची योजना आखली.
पहिला बाऊंसर वाया जाणारागेल्यानंतर माझ्या दुसऱ्या बाउंसरवर शफिक चकीत झाला आणि पायचित झाला. रवींद्र जडेजाने सर्व गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला, भारताने पाकिस्तानचे आठ गडी ३६ धावांत बाद केले. ही संस्मरणीय कामगिरी होती.