आ.तनपुरे यांच्या विकसनशील कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश : माळी
राहुरी दि:26/10/2023.
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रवरा परिसरातील धानोरे गावचे सरपंच श्याम बाळासाहेब माळी यांनी आपल्या समर्थकांसह आज माजी राज्यमंत्री व विद्यमान आ. प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला . सरपंच माळी हे विखे गटातील आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला झटका बसला. आ. तनपुरे यांच्या विकसनशील कार्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.निर्णय घेत असताना गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेत सर्वांनी एकमुखी पाठिंबा दर्शविल्याने प्रवेश केला असल्याचे सरपंच श्याम माळी यांनी सांगितले. त्यांच्या समवेत विशाल बाळासाहेब ब्राह्मणे सनी प्रकाश पगारे गणेश ज्ञानेश्वर मोरे विशाल संजय पिंपळे धनंजय विजय मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य सचिन दिघे अमोल दिघे विजय दिघे मिलिंद अनाप सात्रळ ग्रामपंचायतचे सदस्य सागर डुक्रे जगदीश दिघे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार ताळागाळापर्यंत पोहोचून जोमाने कार्य करावे अशी अपेक्षा आमदार तनपुरे यांनी व्यक्त करून प्रवेश करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.