श्रीगोंदा:दि२७ऑक्टोबर:मनोज जरांगे यांच्या उपोषणाला श्रीगोंद्यात एक दिवशीय उपोषण करत पाठिंबा
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून श्रीगोंदा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवार दि. २७ रोजी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला तालुक्यातून उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता. तसेच महिलांची उपस्थितीही लाक्षणिय होती.
सकाळी शिवप्रतिमा पूजन करून उपोषणाला सुरूवात झाली. यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, आम आदमी पक्षाचे
संयोजक राजेंद्र नि. नागवडे,मराठा नेत्या भारती इंगवले, आरती रणसिंग, नवनाथ खामकर, मारुती भापकर, संतोष इथापे यांची मराठा आरक्षणावर भाषणे झाली. यावेळी अनिल ठवाळ यांनी दलित समाजाच्यावतीने उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी शाहीर नानासाहेब साळुंके यांनी शाहिरी गाऊन मराठा आरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तर रेणुका माता भजनी मंडळाने भजनसेवा दिली.
उपोषणकर्त्यांनी अप्पर तहसिलदार हेमंत ढोकले यांच्याकडे केले.
निवेदन देऊन तात्काळ आरक्षण मिळावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
या लाक्षणिक उपोषणासाठी मराठा तरूण बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रेम मोहिते यांनी