समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा मराठा आरक्षणासाठीचा निर्णय
आश्वी दि.30 ऑक्टोबर 2023
प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरले आहेत. त्यांनी आंदोलनास पाठिंबा देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.
पुढील ५ दिवस कीर्तन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतानाच, मराठा आरक्षण लवकरात मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरक्षणासाठी होत असलेल्या अंतरवाली सराटी – जालना येथील आंदोलनासाठी जाहीर पाठिंबा देण्यासाठी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी कीर्तन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रविवारी करमाळा येथे आयोजित कीर्तनात जाहीर केला.