आरक्षणाच्या मागणीसाठी आमचा सुरुवातीपासूनच पाठिंबा: खा.सुजय विखे पाटील
लोणी दि.1 नोव्हेंबर 2023
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणी काही बोलले तरी त्याचा विपर्यास होतो हे अत्यंत दुर्दैवी असून,आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
खा.सुजय विखे पाटील यांनी राहाता शिर्डी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांची भेट घेतली.मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठीबाच असल्याचे नमूद करून खा.विखे पाटील म्हणाले की,आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता नेत्यांची घर जाळण्यापर्यत येवून ठेपणे हे योग्य नाही,आरक्षणाच्या प्रश्नावर कोणत्याही लोकप्रतिनीधीने व्यक्त केलेल्या प्रतिक्रयेचा विपर्यास केला जाणे योग्य नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
सर्वच लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दित आहेत.परंतू आज जाहीर भाष्य करायला सरपंच पदापासून ते सर्वच पदावर असलेले नेते बोलायला पुढे येत नसल्याकडे लक्ष वेधून या प्रश्नावर प्रतिक्रीया व्यक्त करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे विखे पाटील म्हणाले.
आरक्षणाच्या बाबतीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा पक्षीय जोडे बाजूला ठेवून आरक्षणाच्या मुद्द्यावर सामुहीकपणे काय करता येईल याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.