अहमदनगर बातम्यामराठा आरक्षणासाठी'सरपंचपद'गेले चुलीत: श्याम कानगुडे

मराठा आरक्षणासाठी’सरपंचपद’गेले चुलीत: श्याम कानगुडे

spot_img
spot_img

जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांनी पदाचा राजीनामा देत मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा

कर्जत दि.2 नोव्हेंबर 2023

कानगुडेवाडीचे सरपंच श्याम कानगुडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला आहे,यावेळी नेते मंडळींना गावबंदीचा ठराव देखील मंजूर करण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात फिरकू देणार नाही असा इशारा ग्रामसभेत देण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कानगुडवाडी (ता. कर्जत) येथील जनतेतून बिनविरोध निवडून आलेले राज्यातील पहिले सरपंच शाम कानगुडे यांच्या सह गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

या सोबतच गावाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून सर्वपक्षीय ग्रामसभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. तालुक्यात मराठा आरक्षणावरुन मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली असून सर्वपक्षीय नेत्यांना याचा फटका बसत आहे.

सरपंच श्याम कानगुडे यांच्या सह उपसरपंच उद्धव कानगुडे, ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक कानगुडे, बाळू कानगुडे, राजू साळवे, शोभा कानगुडे , अनुसया कानगुडे, यमुना कानगुडे,

संगीता भीताडे यांनी देखील ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.

सरपंचांसह सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

लेटेस्ट न्यूज़