गावच्या ऐतिहासिक वेशीवर लावले हजारो दिवे…
श्रीगोंदा दि 16 नोव्हेंबर 2023
दीप मांगल्याचे प्रतीक मानले जाते त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंध:कार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. समृद्धीचा, आनंदाचा,उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो.कारण शेतकऱ्यांची घरं भरपूर धनधान्यांनी भरलेली असतात.कामातून जरा उसंत मिळालेली असते आणि गुलाबी थंडीला सुरुवात होते. त्यामुळे दिवाळी हा सण घराघरात मोठय़ा आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवाळी सणाचे औचित्य साधून स्वराज्याचे संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाने त्यागाने निर्माण झालेल्या‘पिंपळगांव पिसा’ या भूमीमध्ये ऐतिहासिक वेशीवर मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२३.रोजी सायंकाळी ग्रामपंचायतीच्या व श्री. पिंपळेश्वर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
‘पिपळगाव पिसा’ गावच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी प्रयत्नशील असणारे गावचे सरपंच श्री.सुर्यजित पवार,गावचे पोलीस पाटिल श्री.उमेशराव जगताप पाटिल,युवा नेते अजिंक्य जगताप,ग्रामपंचायत सदस्य सुरेश राजेभोसले,बापूराव कदम,मनोज नागवडे,शिवाजी शिंदे,संचालक उद्योजक सचिन पंधरकर,शिवभक्त संतोष गुंड,रविंद्र सरोदे,सुहास पवार,शिवभक्त ऋषीकेश सरोदे, देवाभाऊ सरोदे,अनिल पवार,दिवाकर कांबळे,आदी ग्रामस्थांची उपस्थित होते. हा उपक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री.पिंपळेश्वर प्रतिष्ठान पिंपळगांव पिसा यांनी विशेष परिश्रम घेतले.