ग्रामीण विकास केंद्र व कोरो इंडिया मुंबई संस्थेच्या वतीने संविधान दिन उत्साहात संपन्न…
श्रीगोंदा दि.27 नोव्हेंबर 2023
ग्रामीण विकास केंद्र व कोरो इंडिया मुंबई संस्थेच्या वतीने तसेच सावित्री फातिमा विचार मंच व बी.एम ग्रुप श्रीगोंदा, यांच्या वतीने ॲड. संभाजी आप्पा बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली, तो हाच दिवस या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडवण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्याचे आचरण करणे होय, संविधानात नागरिकाच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. स्वातंत्र्य ,समता ,बंधुता, न्याय, राष्ट्राची ,एकता व एकात्मता ,धर्मनिरपेक्षता, समाजवाद लोकशाही ,गणराज्य संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे ते प्रस्तापित करायचे आहे.संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरि कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही.ॲड. संभाजी आप्पा बोरुडे अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना म्हणाले की,ज्या माणसाच्या हाती बारा हत्तीचे बळ असतं तेच माणसं हा कार्यक्रम आयोजित करू शकतात व ज्या माणसाच्या अंगात दहा सिहांचे बळ असते तेच माणसे ऐकायला येतात.२६ नोव्हेंबर हा कार्यक्रम एकट्या कोणत्या समाजाचा नसून सर्व समाज बांधवांचा आहे, बाबासाहेबांचे शिक्षण खूप होऊन सुद्धा ही बाबासाहेबांनी नोकरीच्या अपेक्षा न करता, बाबासाहेबांनी माणसाला माणसात आणण्याचे काम केले,डॉ. आंबेडकर यांनी संविधान दिले नसते तर आज काय परिस्थिती असती हे विचार करण्याच्या पलीकडे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले करिअर स्वाभिमानाने घडवत आहेतहे सर्व बाबासाहेबांच्या कायद्यामुळे व संविधानामुळे. आज देव देवतांचे पूजा करण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारताचे संविधानाच्या ग्रंथाची पुजा करा, त्यांनी दिलेल्या शिकवणीवर चला. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारताच्या संविधानाच्या ग्रंथाचे अभ्यास केला तर आज आयपीएस, पीएसआय, कलेक्टर होऊ शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की ‘शिका संघटित व्हा, आणि संघर्ष करा. कर्मकांड नाकारल्याशिवाय समाज मोठा होणार नाही , सर्व समाजाचे रक्त एकच आहे असे गौतम बुद्धांनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण भेदभाव सोडून माणूस म्हणून जगणे गरजेचे आहे. याशिवाय आपली व समाजाची प्रगती होणे अशक्य आहे.
संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापु माने यांनी केले तर आभार अंजली माने यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी सुनिताताई दरोडे, लता सावंत, अंजली माने, पल्लवी शेलार, राणी मोरे, सुनिता बनकर, रोहिणी राऊत.कैलास ससाने, वंदना भापकर, शिवा घोडके, अनिल ठवाळ, आदी उपस्थित होते.