Saturday, December 21, 2024

हिंदवी स्वराज्य संकल्प भूमीत, अग्निपंखची संकल्पपुर्ती

मोठ्या थाटात प्राथमिक शाळा इमारतीची केली लोकार्पण..

भोर दि.30 नोव्हेंबर 2023

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात करुन श्री. छत्रपतींना सलाम उपक्रम अंतर्गत हिंदवी स्वराज्याची संकल्प भुमी असलेल्या रायरेश्वर गडावर पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी अवघ्या ७५ दिवसात सर्व सुविधायुक्त दोन खोल्या असलेली इमारत उभी करण्याची संकल्प पुर्ती केली आहे त्यामुळे गडावरील चिमुकल्यांना जीवनात झेप घेण्यासाठी हक्काचे पंख मिळाले आहेत.

या शाळा इमारतीचे लोकार्पण आमदार संग्राम थोपटे जी एस टी चे उपाआयुक्त डॉ संदीप भोसले उद्योजक प्रकाश कुतवळ दिपक माने यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव रिंगे होते.
आ. संग्राम थोपटे म्हणाले की नैसर्गिक परिस्थिती आडचणीची असल्याने रायरेश्वर गडावर कामे करताना प्रशासनही हतबल होते मात्र अग्नीपंख फौंडेशनने हे रायरेश्वर गडावर शाळा इमारत बांधकामाचे आव्हानात्मक काम पुर्ण केले कौतुकास्पद आहे.

डॉ संदीप भोसले म्हणाले की हिंदवी स्वराज्याच्या संकल्प भुमीत अग्नीपंख फौंडेशनने ज्ञानमंदीर उभे केले त्यामुळे शिवरायांच्या मावळ्यांच्या मुलांसाठी हक्कांचा निवारा अग्नीपंख फौंडेशनने उभा केला ही एक रायरेश्वर गडावर भविष्याच्या दृष्टीने परिवर्तनाची नांदी ठरणार आहे
जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नलावडे म्हणाले कि अग्नीपंखने रायरेश्वर ला शाळेची नुसती बांधली नसुन डिजीटल सुविधाही उपलब्ध करुन दिल्या त्यामुळे रायरेश्वरची शाळा कात टाकणार आहे.
यावेळी रामदास झेंडे रवी जंगम दिलीप जंगम यांची भाषणे झाली प्रास्ताविक राजकुमार इथापे यांनी केले सुत्रसंचलन दत्ताजी जगताप यांनी केले
यावेळी गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे उद्योजक जालिंदर निंभोरे मोहन आढाव संजय लाकुडझोडे गणेश डोईफोडे बापूसाहेब हिरडे सतिश लगड दिलीप काटे संदीप घावटे अविनाश निभोरे बाळासाहेब दांगट नवनाथ दरेकर राजेंद्र इंगळे शिवदास शिंदे बी बी गोरे किसन वऱ्हाडे जनार्धन घोडेकर दादासाहेब दरेकर अमोल गव्हाणे अंकुश शिंदे दादासाहेब सोनवणे उपस्थित होते आभार दत्तात्रय जंगम यांनी मानले

चौकट
शाळेतील सुविधा
सौर ऊर्जा सिस्टीम
डिजीटल सिस्टीम, डिजीटल साऊंड सिस्टीम,
दोन ग्रंथालये इ लर्निग, अंतर्गत सजावट, खेळाडुंचे फ्लेक्स विद्युत रोषणाई, संगणक सुविधा, शिक्षकांसाठी टी पॉईंट, शेकोटी, चप्पल स्टॅण्ड पिण्याचे पाणी, इन्व्हर्टर सिस्टीम, कपाटे, रॅक, प्रवेशद्वार, तार कंपाऊंड

आणखी महत्वाच्या बातम्या