पत्रकार मीरा शिंदे यांच्या हाती शिवधनुष्य…
श्रीगोंदा दि 8 डिसेंबर 2023
तालुक्यात पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात मागील वीस वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणाऱ्या श्रीमती मीरा नितीन शिंदे यांनी आज शिवसेना पक्ष (शिंदे) गटात आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांची शिवसेना महिला आघाडी अ.नगर जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र अ.नगर जिल्हा दक्षिण शिवसेना प्रमुख अनिल शिंदे, अ नगर लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे निवडणूक निरीक्षक अभिजित कदम, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, श्रीगोंदा तालुका प्रमुख नंदकुमार ताडे, उप जिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
श्रीगोंदा शहरातील बाजार तळावरील राम मंदिरात शिवसेना शिंदे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मीरा शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी बोलताना अभिजीत कदम यांनी मीरा शिंदे यांच्या रूपाने एक धडाडीची महिला रणरागिनी शिवसेना पक्षाला मिळाली असून, त्यांच्या रूपाने पक्षाला मोठी बळकटी प्राप्त झाली असून, पक्षवाढीसाठी त्यांची मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतरा ते अठरा तास जनसेवा करत आहेत. त्यांनी राबवलेल्या विविध शासकीय योजनांचा सामान्य लोकांना कसा फायदा झाला.. याबाबत माहिती देताना शिवसैनिकांनी सामान्य लोकांपर्यंत पोहोचून काम करण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. पक्षवाढीसाठी काही सूचना त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या.
पक्षप्रवेश आणि महिला जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर मीरा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम करण्याची पद्धत पाहून मी प्रभावित झाले. त्यामुळे मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. इथून पुढच्या काळात मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवण्याची ग्वाही त्यांनी येथे दिली.
यावेळी नगरसेवक प्रशांत गोरे, उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे, तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार युवा सेना तालुकाप्रमुख निलेश गोरे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी श्री. अजित दळवी (नगर तालुका प्रमुखशिवसेना), श्री. अमोल हुंबे पाटील (युवा सेना संपर्कप्रमुख), सचिनठोंबरे (युवासेना नगर तालुकाप्रमुख), नितीन गायकवाड (शिवसेनाश्रीगोंदा शहर प्रमुख), निलेश गोरे (युवासेना तालुकाप्रमुख),संदीप भोईटे (युवासेना शहर प्रमुख), गणेश गांजुरे (युवासेनातालुका संघटक), अनिल हिरडे (शहर संघ), समीर काझी(अल्पसंख्याक तालुका प्रमुख), श्रीराम म्हस्के (शिवसेना गटप्रमुख, आढळगाव), शिवसेना नगरसेवक प्रशांत गोरे, निसारबेपारी मीराताई भाई (महिला जिल्हा जिल्हा प्रमुख), राहुलगायकवाड (उपशहर प्रमुख शिवसेना), अनिल दळवी (शहरसंघटक शिवसेना, रघुनाथ शिंदे (जिल्हा संघटक, शिवसेना)यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, महिला, तरुण वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते. मीरा शिंदे यांच्या निवडीबद्दल सर्वचस्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.