रोहित पवार यांची सोशल मीडिया पोस्ट…
कर्जत दि.9 डिसेंबर 2023
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतर आज दुसरा दिवस सुद्धा मलिक यांच्या भूमिकेवरून अजित पवार गटाला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मलिक यांनी आज सुद्धा अधिवेशनाला हजेरी लावत काल बसलेल्या ठिकाणी जाऊन बसले. त्यामुळे अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची बाजू सांभाळून घेत बचावात्मक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.
देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुती सरकारमध्ये सामील करून घेऊ नये, असे म्हटले होते. यानंतर अजित पवार गट कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.नवाब मलिकांमुळे अजित पवार गटासह शिंदे गटाचीही कोंडी होत आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
अशात आता रोहित पवार यांनी अजित पवार यांचं नाव न घेता ते स्वतःच्याच सहकाऱ्यांची बाजू घेताना कसे अडखळत आहेत हे म्हटलं आहे. रोहित पवारांची ही सूचक पोस्ट चर्चेत आहे.
रोहित पवार यांची सोशल मीडिया पोस्ट
तत्पूर्वी, यावर अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बोलताना नवाब मलिक यांनी आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे आम्ही नवाब मलिकांच्या बाबतीत भूमिका घेणे अयोग्य असल्याचे फडणवीस यांच्या कानावर घातले. त्याचबरोबर आमदार म्हणून त्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार असल्याचे सुद्धा पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.