नगरच्या उज्वल भविष्यासाठी काम करत राहू: खा.विखे
श्रीगोंदा दि.10 डिसेंबर 2023
नगर करमाळा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली दहा वर्ष रखडलेले होते. मी खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण केले असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
ते थिटे सांगवी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी प्रताप भैय्या पाचपुते, सिद्धेश्वर देशमुख, शरद बोटे, डॉ. दिलीप बोस, अर्जुन देवा शेळके, बलभीम आप्पा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार विखे म्हणाले, आमदार बबनदादा पाचपुते व माझ्या माध्यमातून थिटे सांगवी या गावात दोन ते अडीच कोटी रुपये मंजूर करून आज या गावामध्ये मी आलो आहे. यापुढेही असेच विकासासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी खासदार विखे यांनी दिली.
तसेच त्याच बजेट पेठ मधून श्रीगोंदा मतदारसंघासाठी आमदार बबनदादा पाचपुते यांनी २०० कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर केले असून ज्येष्ठ आमदार म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत असे मत मांडून खासदारकीच्या माध्यमातून काम करत आज विकासाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले.
चौकट
येणाऱ्या नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यात देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे नगर बायपास व नगर करमाळा राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.