ताज्या बातम्यातहसील कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट, बंदोबस्त करा म्हणत शिवसेना आक्रमक

तहसील कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट, बंदोबस्त करा म्हणत शिवसेना आक्रमक

spot_img
spot_img

श्रीगोंद्यात ठाकरे गट सरकारी कार्यालयातील दलाला विरोधात आक्रमक

श्रीगोंदा दि.20 डिसेंबर 2023

तहसील कार्यालयासह आसपासच्या सरकारी इमारतींमध्ये दलालांनी वेढा घातला आहे. वांरवार प्रशासनाला कळवूनही दलालांचा बंदोबस्त होत नाही. त्यामुळे सामान्यांची मोठी आर्थिक कोंडी होत असून, यात कर्मचारी व काही अधिकारीही सामील आहेत, असा आरोप करीत शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.

शासकीय कार्यालयातील अनागोंदी कारभार, त्या ठिकाणी असलेले खासगी कर्मचारी व कार्यालयांना पडलेला दलालाचा विळखा याबाबत तहसीलदार हेमंत ढोकले यांना निवेदन देण्यात आले. याबाबत दुतारे म्हणाले, श्रीगोंदे शहरात मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पोलिस ठाणे,

पंचायत समिती, तलाठी कार्यालय, नगरपरिषद, आरोग्य विभाग ही कार्यालये आहेत. शहरात इतर ठिकाणी कृषी कार्यालय, बांधकाम विभाग, कुकडी पाटबंधारे, वन विभाग इत्यादी कार्यालये कार्यरत आहेत. तालुक्यातून लोक कामासाठी येतात. तहसील कार्यालयात पुरवठा विभागात लोकांची रेशनकार्ड मिळविण्यासाठी वर्दळ असते. या विभागातील कर्मचारी हे काही खासगी कर्मचारी व दलाल लोकांना हाताशी पाळून त्यांचेमार्फतच रेशनकार्डचे काम दलाल

घेऊन आले, तरच लोकांचे काम होणार असे लोकांना सांगून ते दलालामार्फत रेशनकार्ड काढून देण्यासाठी हजारो रुपये उकळत आहेत.

तहसील कार्यालयातील इतर विभागात देखील रोज तेच तेच दलाल लोक कार्यालयात दिवसभर ठाण मांडून असतात. तेथूनच पोलिस ठाण्यासह इतर कार्यालयातील दलाली सुरू असते. या संदर्भात तहसील कार्यालयात व इतर कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क केला. दलालांचा बंदोबस्त न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुतारे यांनी दिला.

यावेळी तालुका संघटक सुरेश देशमुख, जमील शेख, सागर खेडकर, शिवाजी समदडे, रघुनाथ सूर्यवंशी, नितीन लोखंडे, चंद्रकांत धोत्रे, दिलीप आनंदकर, शरद नागवडे, बाबासाहेब चोरमले, भीमराव भिसे, हरिभाऊ काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज़