ताज्या बातम्याफ्रेंडशिप, ब्लॅकमेलिंग, मग बलात्कार...जिल्ह्यात नवा जिहाद

फ्रेंडशिप, ब्लॅकमेलिंग, मग बलात्कार…जिल्ह्यात नवा जिहाद

spot_img
spot_img

न्यायमंदिर नंतर, पण ‘त्या’बलात्कार पिढीतेंना पोलिसांकडून न्याय मिळेल का ?

श्रीगोंदा दि.20 डिसेंबर 2023

शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या अकरावीच्या दोन विद्यार्थीनींवर गेल्या आठवड्यात बलात्कार झाला. पिडीतेच्या आईने दिलेली फिर्याद बघितली तर बलात्काराचा हा प्रकार धक्कादायक होता. कोवळ्या कळ्यांना त्यांच्यात मैत्रिणीच्या माध्यमातून जाळ्यात अडकून कुस्करायचे आणि नंतर वारंवार शरिरसुखाची मागणी करायची, हे गंभीर होते. या सगळ्या प्रकरणात पोलिसांकडून कठोर कारवाईच्या अपेक्षा आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून फक्त वरवरची कारवाई होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

सोहेल रियाज जकाते व जिशान कलीम जकाते (दोघेही रा. जकातेवस्ती, श्रीगोंदा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी त्यांच्या एका मैत्रिणीच्या सहाय्याने अकरावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींशी ओळख केली. त्याच मैत्रिणीला सांगून, त्या दोघींना कुस्करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला. शहराजवळील एका लाँजवर नेऊन अत्याचार करण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकाराची शूटींग काढून आरोपी वारंवार त्यांची भूक भागविण्याचा प्रकार करु लागले. अखेर कंटाळलेल्या या पिडीत मुलींनी धैर्य दाखवले आणि प्रकरणाला वाचा फुटली.

या सगळ्या प्रकारात अनेक प्रश्न अजूनही निरुत्तरीत आहेत. वसतीगृह व्यवस्थापनाला मुली बाहेर जात असताना समजत कसे नाही..? आरोपी थेट महाविद्यालय परिसरात येतात कसे..? ज्या लाँजवर अत्याचार होतो, त्या लाँजवर शाळेच्या ड्रेसवर रुम कशी उपलब्ध होते..? पोलिस लाँजमालकाला सोडून फक्त मॅनेजरला सहआरोपी कसे करतात..? फ्रेंडशीप- ब्लॅकमेलिंग- बलात्कार ही साखळी पोलिसांना समजत कशी नाही..? समाजाने व पोलिसांनी वेळीच पावले उचलली नाही तर असे प्रकार खूप धोकादायक ठरतील. शिवसेना महिला आघाडी या सगळ्या प्रकारात आक्रमक झाली असली तरी, पोलिसांना ‘त्या’ तिसऱ्या मध्यस्ती मैत्रिणीला ताब्यात घेऊन अजून कोणावर अत्याचार झाला ती साखळी शोधून काढावी लागणार आहे. इतर प्रत्येक प्रकरणात ‘हात ओले’ करणाऱ्या पोलिसांनी या नाजूक प्रकरणात मात्र कुणावरही दया दाखवू नये, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे.

लेटेस्ट न्यूज़