ताज्या बातम्याआरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर...

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…

spot_img
spot_img

तालुक्यातील घोडेगाव आरोग्य विभागाचा गलथान कारभारा विरोधामध्ये एक दिवसीय उपोषण-पल्लवी शेलार.

श्रीगोंदा दि.22 डिसेंबर 2023

दि.२१डिसेंबर २०२३ – श्रीगोंदा आरोग्य विभागाच्याअंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उप-केंद्रकार्यक्षेत्रामध्ये सामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाच्या वतीने कामकरण्यात येते. यासाठी शासनाच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, नर्स, आशासेविका अशा स्वरूपाच्याकर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावपातळीवरील प्रत्येक घरातील लहान बालके वइतर सदस्याच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्यावर मोफत उपचारकरण्यासाठी शासन दरवर्षी हाजारो कोटीचे बजेट सामान्याच्या आरोग्यासाठीवापरले जाते.

या बजेटमधून राबिविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधानक्की सामान्य लोकांपर्यंत पोहचतात का ? हा सर्वात मोठा प्रश्न सामान्यजनतेला पडला आहे. शासनाकडून हाजारो कोटीच्या निधीमधून घेण्यात येणारेगोळ्या-औषधे, नेमणूक करण्यात येणारे डॉक्टर, मोफत वाटण्यात येणारेसाहित्य हे नक्की लोकांपर्यंत पोहचतात कि नाही हे पाहणारी यंत्रणाशासनाकडे नसल्याचे आजच्या दिवशी पाहण्यास मिळाले.

 

तहसील  कार्यालयाच्यासमोर आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व घोडेगाव उपकेंद्र या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या विविध तक्रारीच्या संदर्भात घोडेगाव येथील ग्रामस्थांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाच्या माध्यमातून उपोषणकर्त्या पल्लवी शेलार यांच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या.

१) प्रसूती नंतर मिळणाऱ्या शासकीय भत्त्याचीमाहिती त्यांच्या कुटूंबियांना देऊन कागदपत्रे दिल्यानंतर तातडीने भत्तात्याच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा. २) आरोग्य यंत्रणेकडून गावातीलकुठलाही लहान मुलगा वजन, लसीकरण, शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नयेयासाठी जनजागृती कार्यक्रम करण्यात यावे व कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्याआशा सेविका यांच्यावर तातडीने कार्यवाही करावी. ३)प्राथमिक आरोग्य केंद्रव उपकेंद्र यामध्ये आवश्यक औषध साठा व कायमस्वरूपी निवासी डॉक्टर यांचीनियुक्ती करावी. तसेच निवासी डॉक्टर २४ तास उपलब्ध असावे. ४) प्रा.आरोग्यकेंद्रात औषधे उपलब्ध असताना पेशंटला खाजगी मेडिकल मधून औषध आणण्याससांगून उपचार करणाऱ्या डॉक्टर यांच्यावर कडक कार्यवाही करावी. ५) १८ ते२५ वयोगटातील मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप न करणाऱ्या व पैसे घेऊनसॅनिटरी पॅडचे वाटप करणाऱ्या आशा सेविका किंवा संबंधितावर योग्य तीकार्यवाही करण्यात यावी. सॅनिटरी पॅडचे वाटप केले का नाही या बाबत तपासणीयंत्रणा तयार करून चौकशी करावी. ६) लोकसंख्येच्या प्रमाणात आशा सेविकानेमण्यात याव्यात. तसेच गावातील लोकांना आरोग्याच्या बाबत योग्य तीमाहिती देणे त्याच्यावर बंधनकारक असावे. ७) प्राथमिक आरोग्य केंद्राचेनेमणूक केलेले डॉक्टर ओपीडी मध्ये न थांबता इतर ठिकाणी आराम किंवा आपलेघरचे काम करत असतात. अशा डॉक्टर वर तातडीने कारवाई करावी. ८) घोडेगावउपकेंद्रामध्ये लहान मुलांच्या लसीकरणाच्या दिवशी त्या मुलांचे वजनघेण्यासाठी तात्काळ वजन काटा उपलब्ध करून देण्यात यावा. ९) घोडेगावउपकेंद्रामध्ये डिलिव्हरी करण्यासाठी कुठलीही सोया नाही. ती तातडीने सोयउपलब्ध करून द्यावी. अशा नऊ मागण्या या उपोषणाच्या माध्यमातून करण्यातआल्या.

उपोषण स्थळी श्रीगोंदा तालुका आरोग्य अधिकारी श्रीम.डॉ. शैलाडांगे मॅडम, प्रा.आ.केंद्र आढळगाव डॉ. कोल्हे, ना.तहसिलदार मा.नेवसेसाहेब, कुलकर्णी साहेब यांनी भेट देऊन उपोषणकर्त्याच्या मागण्या समजूनघेऊन त्या निरासन करण्याचा प्रयत्न केला. तसेच तातडीने वरिष्ठकार्यालयाच्या संदर्भातील असणाऱ्या विषया संदर्भात तातडीने पत्रव्यवहारकेला. परंतु प्रसूती नंतर मिळणाऱ्या शासकीय भत्त्याची माहिती त्यांच्याकुटूंबियांना देऊन कागदपत्रे दिल्यानंतर तातडीने भत्ता त्याच्या खात्यावरवर्ग करण्यात यावा व १८ ते २५ वयोगटातील मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटपन करणाऱ्या व पैसे घेऊन सॅनिटरी पॅडचे वाटप करणाऱ्या आशा सेविका किंवासंबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच आढळगाव प्रा.आरोग्यकेंद्रामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्या बाबतच्यातक्रारीचे निरासन आरोग्य अधिकाऱ्यांनकडून झाले नसल्याने व उपलब्ध औषधसाठा असताना खाजगी मेडिकल मधून औषध-गोळ्या लिहून का देण्यात येतात यासंबधित विषयाबाबत उत्तरे देता आले नसल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषणचालू ठेवले आहे.

 

यावेळी समाजिक कार्यकर्त्या पल्लवी शेलार बोलताना म्हणाल्याकि, तालुका आरोग्य अधिकारी या उपोषणा मध्ये केलेल्या मागण्या बाबत जरीसकारात्मक असल्या तरी उपोषणामधील ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामधील काहीमागण्या पूर्ण झालेल्या नसल्याने पुढील आठ दिवसामध्ये पुन्हा राहिलेल्याविषयांना घेऊन पुन्हा उपोषणाला बसण्यात येणार आहे. तसे पत्र येत्या दोनदिवसामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. असेच प्रश्न इतरहीआरोग्य केंद्रामध्ये असून नागरिकांनी या प्रश्नांना घेऊन समोर यायला पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले. जो पर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीतो पर्यंत मागे हटणार नसल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले आहे. याउपोषणामध्ये उज्ज्वला मदने, लता शिंदे, सुनिता बनकर, सुनिता राउत, मुमताजमुलानी, कविता सिधनकर यांनी सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.

लेटेस्ट न्यूज़