अहमदनगर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त जाहीर
श्रीगोंदा दि.28 डिसेंबर 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना श्री. अजित दादा पवार प्रांताध्यक्ष मा.खा श्री सुनील जी तटकरे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष मा श्री प्रशांत जी गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे अहमदनगर दक्षिण मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त घोषित करण्यात आल्या.
पक्षाच्या ध्येय धोरणाची प्रभावी अंमलबजावणी तळागाळातील जनतेत रुजवण्याची जबाबदारी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली.*कर्जत जामखेड मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त युवा वर्गाला पक्षाची जोडण्याची जबाबदारी तुम्हाला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर असेल असे स्पष्ट शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. ना. श्री अजितदादा पवार यांनी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना सांगितली.
सोशल मीडियाचा प्रभाव वापर करून नवतरुण मतदार वर्गाला पक्षाशी जोडण्याची जबाबदारी तुम्हा वर असेल असे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. महिला वर्गाच्या माध्यमातून जास्तीत जास्त यु वती व महिला पक्षाशी जोडून त्यांच्यासाठी विविध उपक्रम घेण्याची मागणी मा श्रीमती रूपालीताई चाकणकर यांनी केले.
या नियुक्त पदाधिकाऱ्यां मध्ये मध्ये श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी मा श्री शरद नवले कर्जत तालुकाध्यक्षपदी मा. श्री बाळासाहेब शिंदे व कर्जत युवक तालुकाध्यक्षपदी मा श्री संतोषजी धुमाळ यांची निवड करण्यात आली* वरील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी आबासाहेब डमरे मा. सरपंच पिनू सेट धांडे व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते