श्रीगोंदात शिवस्वराज्याचे स्वागत…
श्रीगोंदा दि.12जानेवारी 2024
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून लंके कुटुंबातून एक उमेदवार निवडणूक लढणार आहे. समोर कोण उभा आहे, याचा विचार न करता आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांनी बुधवारी श्रीगोंदा येथे माध्यमाशी बोलताना सांगितले.
आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. ही यात्रा बुधवारी श्रीगोंदा येथे आली असता राणी लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरांत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. या यात्रेस पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी येथून सुरुवात झाली आहे. कर्जत, जामखेड तालुक्यात या यात्रेचे स्वागत करण्यात आले. नगर तालुक्यात या यात्रेची सांगता होणार आहे. यावेळी आ. नीलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन, देविदास काका शिर्के,शरद नवले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषा खामकर,सतीश मखरे, यांच्या सहकार्य करते मोठ्या संख्येने उपस्थित होते