श्रीगोंद्यात आमदार अपात्रता निकालानंतर फटाके वाजत जल्लोष..
श्रीगोंदा दि.13.जानेवारी 2024
विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूने निकाल देताना शिंदे गटाच्या १६ आमदारांना पात्र ठरविल्याच्या निर्णयाचे शिवसेना शिंदे गटाच्या श्रीगोंद्यातील नेत्यांनी स्वागत केले आहे.
पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीराताई शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या खरे पणावर दुसऱ्यांदा अनुकूल निकाल लागल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खरे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब हेच करीत आहेत. या माध्यमातून खऱ्या शिवसेनेविषयी कौल मिळाल्याने महाराष्ट्राच्या विकासासह तमाम शिवसैनिकांच्या आशा-आकांक्षा उंचावल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सभापती नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे स्वागत करताना भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेचा विस्तार होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शहरातील शनी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करीत मिठाई वाटली. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे,शहर प्रमुख नितीन गायकवाड ,युवा अध्यक्ष निलेश गोरे युवा शहराध्यक्ष संदीप भोईटे, नगरसेवक गणेश भोस,शिवानंद ताडे, गणेश गांजुरे संतोष कोथिंबीरे, प्रशांत गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.