महसूल मंत्री विखे पाटील यांनी नेमके काय केले आवाहन..
नेवासा दि.26 जानेवारी 2024
अहमदनगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा ही एक मोठी समस्या आहे. यातून गुन्हेगारी देखील फोफावलेली दिसते. दरम्यान या वाळूचोरीला आळा बसावा यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण आणले. त्यामुळे ६०० रुपयात वाळू मिळू लागली.
दरम्यान आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू उपसा विषयी एक आवाहन केले आहे. ते म्हणले आहेत की, अवैध वाळू उपसा ही समाजाला लागलेली कीड आहे.
तरुणांनी अवैध वाळू उपसा करताना आई-वडिलांच्या भावनांचा विचार करावा. यापुढे अवैध वाळूप्रश्नी थेट माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन विखे यांनी केले आहे.
नेवासा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याप्रसंगी विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हा अधिकारी सुहास मापारी, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नवीन इमारती साइड मार्जिनसाठी तहसील कार्यालयाजवळील शेतकऱ्यांनी जमिनी इमारतीसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
मंत्री विखे पाटील म्हणाले…
विखे पाटील म्हणाले, तहसील कार्यालयाची इमारत १०० वर्षांपूर्वीची असून, या इमारतीतून गेली शंभर वर्षे न्याय दानाचे काम झाले. तहसील संजय बिराजदार यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांकडून जागा उपलब्ध करून दिल्याने या इमारतीचा मार्ग मोकळा झाला. वाळूप्रश्नी विखे-पाटील म्हणाले, या तालुक्यात वाळू लिलाव व्हायला काय अडचण आहे.
चांगले नागरिक पुढे येत नसल्याने वाळूच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे यापुढे शासन बघ्याची भूमिका घेणार नसल्याचे विखे पाटील म्हणाले. तसेच यापुढे अवैध वाळूप्रश्नी थेट माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन विखे यांनी केले आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम अभियंता सुरेश दुबाले, नायब तहसीलदार किशोर सानप, चांगदेव बोरुडे, नगरपंचायत मुख्याधिकारी अंबादास गर्कल, ऋषिकेश शेटे आदींसह नागरिक उपस्थित होते.