ताज्या बातम्या'त्या'तरुणाची कोयत्याने वार करून हत्या

‘त्या’तरुणाची कोयत्याने वार करून हत्या

spot_img
spot_img

श्रीगोंदा तालुक्यातील मध्यरात्रीचा थरार: दोन संशयतांना घेतले ताब्यात

बेलवंडी :दि.31 जानेवारी 2024

श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे अज्ञात चार जणांनी घरात घुसून पत्नीला चाकूचा धाक दाखवत पतीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. या घटनेत योगेश सुभाष शेळके (वय ३५) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.३०) पहाटे घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात आरती योगेश शेळके (वय २६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथके रवाना

घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी बेलवंडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हेशाखा सर्व बाजूने सखोल तपास करत आहे. याप्रकरणी दोन संशयित इसमांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून इतर आरोपींच्या शोधात पोलीस पथके रवाना केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी धाव घेत पाहणी करून पुढील तपास कामी सूचना दिल्या.

लेटेस्ट न्यूज़