दौंड पोलिसांची कारवाई, आरोपींवर यापूर्वीचेही गुन्हे दाखल
दौंड दि.6 फेब्रुवारी 2024
घराचा दरवाजा तोडून रात्री मोबाईल आणि रोकड, पाकीटे वैगरे मारहाण करून बळजबरीने घेऊन जाणाऱ्या एका सराईत टोळीतील आरोपीला दौंडच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.अजय प्रकाश राठोड (रा.गिरीम ता. दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि.६ रोजी पहाटे अडीच वाजता कुरकुंभ एमआयडीसीमध्ये काम करणारे परप्रांतीय मजूर आपल्या राहते घरी झोपले असताना पाच इसमांनी येऊन दरवाजाला धडका देऊन घरात जाऊन दोन मोबाईल, सहा हजार रोकड व पाकिटे असा 56 हजारांचा माल मारहाण करून जबरीने घेऊन गेले. याबाबत आशिष रमेश प्रजापती यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीसांना तपासाबाबत सूचना दिल्या.गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून गुन्हातील एक आरोपी नामे अजय प्रकाश राठोड (रा.गिरिम) दौंड पोलिसांनी शिताफीने गिरीम गावच्या हद्दीमध्ये आपल्या ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता गुन्ह्यात चोरून नेलेल्या वस्तू त्यामध्ये २० हजार रू. किमतीचा आयफोन मोबाईल मिळून आला. फरार असलेल्या अन्य आरोपींचा शोध दौंड पोलीस ठाण्याचे अंमलदार करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस अंमलदार पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहेत.