उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नियुक्तीचे पत्र
श्रीगोंदा दि.18 फेब्रुवारी 2024
दिनांक 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे श्रीगोंदा तालुक्यातील घार गाव येथे कृषी व्यवसाय करणाऱ्या अहमदनगर जिल्हा सीड्स अँड फर्टीलायझरच्या उपाध्यक्षा सौ .मनीषा संजय खामकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
त्यांच्या या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष
सुनीलजी तटकरे , राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे , नवनियुक्त जिल्हाध्यक्षा अनुराधाताई नागवडे, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष शरद नवले, फर्टीलायझर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश मुनोत , जिल्हा उपाध्यक्ष देविदास शिर्के, श्रीगोंदा शहराध्यक्ष समीर कोथिंबिरे, रोहन नेटके यांनी अभिनंदन केले .
“मी या निवडीचा उपयोग समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे महिला विषयक कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करून माझी निवड सार्थ ठरवेल” अशी मनोकामना नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस मनीषा खामकर यांनी व्यक्त केली.