कार्यकर्त्यांनी जिद्दीने प्रचारासाठी बाहेर पडावे :थोरात
अहमदनगर दि.24 फेब्रुवारी 2024
नगर येथील काँग्रेसच्या काल दि. २३ रोजी झालेल्या पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात श्रीगोंद्यातील नूतन पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधून घेतले .
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे आणि त्यांच्या पत्नी जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ अनुराधा नागवडे यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस चे काय होणार हा प्रश्न श्रीगोंदा तालुका सह जिल्ह्याला पडला होता पण सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत दरेकर आणि शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी काँग्रेस पक्षात थांबण्याचा निर्णय घेतला आणि ते दोघे समर्थक कार्यकर्ते सह नगर येथील नक्षत्र कार्यालयात पोहोचले तेथे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या शिबिरात ज्ञानदेव वाफारे मार्गदर्शन करत होते कार्यकर्त्यांनी घोषणा देत शिबिरात प्रवेश केला आणि जिल्हा काँग्रेस मध्ये उत्साह वाढला.
मतदान घडवून आणण्यासाठी करावयाच्या कार्य बाबत हे शिबिर होते.
शिबिरात आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हा विचार असून पोटे दरेकर यांच्या रूपाने तालुक्यात काँग्रेस विस्तार होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांना सर्वाधिकार दिल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले.
यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन करताना महागाई,बेरोजगारी , कांदा निर्यात बंदी यामुळे जनता केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात असून महा विकास आघाडी कडे आशेने पाहत असून कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्यास निश्चित यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांना जिद्दीने प्रचारा साठी बाहेर पडण्याचे आवाहन केले.
श्रीरामपूर चे आमदार लहू कानडे यांनी बोलताना कार्यकर्त्यांनी गावोगावी लोकात जावून तेथील प्रभावी कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला पक्ष कार्य करण्याची प्रेरणा द्यावी सद्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थिती आणि महागाई बाबत लोकांना सांगून महा विकास आघाडी सरकारने घेतलेल्या जनहिताच्या निर्णयांची माहिती देऊन पक्ष प्रचार करण्याचे आवाहन केले.
श्रीगोंदा तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी कष्टाने पक्ष वाढवला मंत्री असताना श्रीगोंदा तालुक्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला म्हणून मी आणि मनोहर पोटे आम्ही दोघांनी थोरात यांच्या वर विश्वास ठेऊन पक्षात थांबलो आहोत आज राजे,सरदार सोडून जात आहेत तिथे आम्ही सैनिक राहिलो असून मनोहर पोटे यांनी स्वकर्तृत्वावर नगर पालिकेत विजय मिळवला त्यांच्या मागे कार्यकर्ते ,नागरिक भक्कम पणे उभे असून तालुक्यात कोंग्रेसला निश्चित चांगले दिवस येतील.
ज्ञानदेव वाफारे यांनी बूथ केंद्र पासून ते तालुका पातळीवर सुसंवाद,कामाचे वाटप,उपलब्ध साधन सामग्री मधून काम करण्या बाबत मार्गदर्शन केले.
पत्रकारांशी संवाद साधताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी श्रीगोंदा तालुक्यातील एमआयडीसी मंजूरी बाबत विचारता खा.डॉ.सुजय विखे यांचे नाव न घेता जशी कांदा निर्यात बंदी उठली तशी एमआयडीसी चे होणार असून अशी ही बनवाबनवी म्हणत टीका केली.
श्रीगोंद्यातील पाट पाणी इतर प्रश्नावर प्रशांत दरेकर,मनोहर पोटे हे जनाधार असलेले पदाधिकारी असल्याने आंदोलनासाठी तयार असून ते सक्षम पणे काम करतील असे सांगितले.