विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण संपन्न
नगर दि.11 मार्च 2024
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे दि. ७ मार्च रोजी लोकार्पण करण्यात आले . मा. डॉ. विरेंद्र कुमार, केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या शुभ हस्ते पुनर्वसन केंद्राचे दृकश्राव्य पद्धतीने दुपारी २ वाजता लोकार्पण करण्यात आले . या वेळी मा. डॉ. विरेंद्र कुमार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट् केले कि केंद्र सरकार हे प्रत्येक दिव्यांग पुनर्वसन केंद्र सर्व दृष्टीने सक्षम करणार आहेत. दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. या कार्यक्रमासाठी कुमारी प्रतिमा भौमिक
माननीय राज्य मंत्री सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, श्री राजेश अग्रवाल,आईएएस,सचिव व श्री राजीव शर्मा,(भा.व.से.) संयुक्त सचिव दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग हे द्रुकश्राव्य पद्धतीने उपस्थित होते.
या मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील ३५ उत्तम सेवा देणारे व सर्व सोयींनी युक्त पुनर्वसन केंद्रांची दिव्याग क्षेत्रात काम करण्यासाठी निवड कऱण्यात आली आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहमदनगर हे ६५०० स्क्वेअर फूट मध्ये स्थापित असून येथे भौतिक उपचार, वाचा उपचार,मानसउपचार , वैद्यकीय उपचार व कृत्रिम अवयव निर्मिती असे विविध विभाग आहेत. पुनर्वसन केंद्रा मार्फत दिव्यांग सर्व्हेक्षण, शिग्र्निदान व उपचार, कौशल्य विकास आदी उपक्रम राबविले जातात. पुनर्वसन केंद्राने स्वतःचे संकेत स्थळ व मोबाईल ॲप बनवले असून नगर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सर्व सुविधा एका क्लिक वर उपलब्ध करून दिल्या आहेत. दररोज या केंद्रामार्फत १४-१५ दिव्यांग मुलांना भौतिक उपचार व वाचा उपचार दिले जातात. कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी सुसज्ज विभाग असून दिव्यांग बांधवाना इडिप , सिपडा व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कृत्रिम अवयव मोफत दिले जातात. पुनर्वसन केंद्राने जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण सुरु केले असून याद्वारे राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना गरजूंपर्यंत पोहचविता येणार आहेत.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राने मागील दोन वर्षात ७१४७ दिव्यांग व्यक्तींना मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात इडिप योजनेअंतर्गत सहायक साधनांचे वाटप केले आहे. राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत २०२२-२३ मध्ये सुमारे ३७११७ वयोवृद्ध व्यक्तींना सहायक साधनांचे वाटप करून या योजनेचा देशपातळीवर एक विक्रम प्रस्थापित केला. या कार्याबद्दल देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी हि पुनर्वसन केंद्राचे पत्राद्वारे अभिनंदन केले होते.
या लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रशासक म्हणुन मा.श्री. स्वानंदकुमार पांढरे, आलियावर जंग इन्स्टिटयूट , तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचे संचालक डॉ. अभिजित दिवटे, डॉ. पाडुरंग गायकवाड महासचिव, विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, डॉ. पडळकर सर, डॉ. दिपक अनाप, प्रकल्प समन्वयक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र तसेच डॉ. अभिजीत मेरेकर प्रकल्प समन्वयक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व डॉ. प्रसाद काजळे आदी उपस्थित होते