माजी खासदार दिलीप गांधी यांची राहिलेली कामे आपण पूर्ण करू राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस रवींद्र कोठारी
कर्जत दि.19 मार्च 2024
माजी खासदार दिलीप गांधी यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस तथा नगर दक्षिण चे संभाव्य उमेदवार रवींद्र भाऊ कोठारी यांच्या वतीने प्रतिमेस हार घालून पुण्यतिथी साजरी करण्यात आली या वेळी कोठारी यांनी गांधी यांच्या आठवणीना उजाळा दिला
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे दिल्ली येथे 17 मार्च 2021 मध्ये निधन झाले गांधी हे जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे लोकप्रिय नेते होते.
सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. आशा नेत्याला आपण मुकलो अशी शोकांतिका आहे , स्व गांधी यांचे राहिलेली अपूर्ण कामे आपण पूर्णत्वास नेन्ह्याचा प्रयत्न करू हेच उद्दिष्ट्य समोर ठेऊन आपण पुढील राजकारण करू असे या वेळी कोठारी म्हणाले