मुळा उजव्या कालव्यातून ०१ एप्रिल २०२४ रोजी उन्हाळी आवर्तन सोडणे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
नेवासा दि.26 मार्च 2024
रब्बी हंगामा सुटलेल्या आवर्तनाला दोन महिने पूर्ण झाले असून, तालुक्यातील पाण्याची परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे. हाता तोंडाशी आलेला घास पाण्याअभावी जात आहे शेतकऱ्यांनी शेतात गहू, हरभरा, मका, इत्यादी पिके केलेली आहेत. हे पिके अंतिम पाण्यावर असून पाणी पातळी अत्यंत खालवल्याने ही पिके धोक्यात आली आहे. यासाठी तातडीने मुळा उजव्या कालव्यातून दिनांक एक एप्रिल 2024 रोजी आवर्तन सुरू करण्याची मागणी तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. पाण्याची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे पिण्याचे पाणी शेती व जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न पाण्याअभावी गंभीर बनत चालला आहे. मुळा उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन न सोडल्यास हे सर्व पिकांचे नुकसान होणार आहे. मागील वर्षी सततचे पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी पूर्ण उध्वस्त झालेला आहे. त्यातच रब्बी हंगामातील पिके ही अंतिम पाण्यावर असल्याने पाणी पातळी खाली गेल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यातच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे या सर्व परिस्थिती आज जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे समोर आमदार मुरकुटे यांनी मांडले 1 एप्रिल रोजी पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळून त्यांची पिके वाचू शकतात गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीतून कुठले उत्पन्न मिळू शकलेले नाही. यावर्षी रब्बी हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात असताना पाणी नसल्यामुळे तेही धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आपण एक एप्रिल 2024 रोजी तातडीने मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्याची आग्रही मागणी मा आ मुरकुटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.