ताज्या बातम्यातेव्हा आजी-माजी खासदार कोणत्या बिळात लपले होते. रुपवतेंचा हल्लाबोल

तेव्हा आजी-माजी खासदार कोणत्या बिळात लपले होते. रुपवतेंचा हल्लाबोल

spot_img
spot_img

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्याकडून विरोधकावर जोरदार हल्लाबोल 

शिर्डी दि.25 एप्रिल 2024

मुंबईचा पार्सल म्हणून मला हिणवलं गेलं मात्र कोरोनाच्या काळात हेच आजी-माजी खासदार कुठल्या बिळात लपून बसले होते असे शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) उमेदवार असलेल्या उत्कर्ष रूपवते ( Utkarsh Rupwate) यांनी भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे ( Sadashivrao Lokhande) यांचा नाम उल्लेख टाळत जोरदार हल्लाबोल केला.

 

तसेच लोखंडे हे सिनेमातील मिस्टर इंडियाचा आहे ते कधी दिसतच नाही असा टोला देखील यावेळी रूपवते यांनी विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांना लगावला.

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Constituency) वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेल्या उत्कर्ष रुपवते यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी त्यांनी आपल्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केलेले होते. यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंचावरूनच रुपवते यांनी विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या वरती जोरदार निशाणा साधला.

 

लोखंडे म्हणजे मिस्टर इंडिया…

 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेल्या उत्कर्ष रूपवते यांनी आज आपल्या प्रचार सभेतून लोकसभेचे रणसिंग फुंकले. यावेळी त्यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला. लोखंडे म्हणजे हिंदी सिनेमातील मिस्टर इंडियाचा आहे. ते कधी मतदारसंघात दिसतच नाही असा टोला रूपवते यांनी लगावला.

 

यावेळी बोलताना रूपवते म्हणाल्या की लोकसभा निवडणुकांची बिगुल वाजले होते त्यावेळेस मी मतदार संघामध्ये फिरत होते. यावेळी जन भावना होती की दोन्ही उमेदवारांना आम्हाला मतदान करायचे नाही आहे आम्हाला तिसरा पर्याय हवा तुम्ही स्वतः उमेदवारी करा आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ अशी जनभावना यावेळी होती.

 

आज जे सत्ताधारी आहेत ते कुठल्याही प्रश्नांवरती बोलायला तयार नाही नागरिकांच्या समस्या असो महिलांचे प्रश्न असो शेतीचे प्रश्न असो मात्र ते कोणत्याही विषयावरती भाष्य करत नाही. कुणी काही बोलू मात्र आपण कोणतीही टीका टिप्पणी करायची नाही तसेच खालच्या पातळीचे राजकारण करायचे नाही असा सल्ला देखील यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीसाठी दिवस थोडे राहिले असून आपल्यासमोर मोठी धनशक्ती उभी राहिली आहे. किंबहुना यांना जी यंत्रणा म्हणतात ती आपल्यासमोर उभी आहे मात्र मला खात्री आहे की जिल्ह्याची एक कन्या म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतील विश्वास यावेळी रुपवते यांनी व्यक्त केला.

 

त्यावेळेस कोणत्या बिळात लपून बसले होते

 

मुंबईचा पार्सल म्हणून मला हिणवलं गेलं. मात्र मी आजी-माजी खासदारांना विचारू इच्छिते की कोविडचा काळ होता त्यावेळेस तुम्ही कोणत्या बिळात लपून बसले होते . कोरोना काळात मी मुंबईत होते मात्र त्या ठिकाणाहूनही मी अकोले, संगमनेर या अनेक भागांमध्ये मदतीचा हात पोहोचवला.

मला मुंबईचा पार्सल म्हणणाऱ्यांनी हे सांगावं की ज्यावेळेस महिलांचे प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेस आंदोलन उभे केले का. प्रश्न निर्माण झाला असताना त्यावेळेस हे दोघं कुठल्या बिळात लपून बसले होते असा सवालही यावेळी रुपवते यांनी केला.

लेटेस्ट न्यूज़