नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट!
अहमदनगर दि.2 मे 2024
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा धुरळा सुरू आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सुजय विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी कडवे आव्हान दिल्याचे दिसत आहे.
एकीकडे निलेश लंके यांनी सुजय विखेंविरोधात रान उठवले असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभा उपसभापती माजी आमदार विजय औटी यांनी सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. निलेश लंकेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महायुतीकडून सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. सुजय विखेंना शह देण्यासाठी निलेश लंके यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून पायाला भिंगरी बांधून प्रचारसभांचा धडाका लावला आहे.
अशातच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) मोठी फूट पडली असून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभा उपसभापती माजी आमदार विजय औटी यांनी लोकसभेसाठी सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे निलेश लंकेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विजय औटी यांनी आपल्या भूमिकेबाबत मौन धरले होते. अखेर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. पारनेर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मर्जीने महायुतीला पाठिंबा देण्याची औटी यांची भूमिका आहे. त्यामुळे निलेश लंके यांना स्वतःच्या घरातूनच मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.