योगा निरोगी जीवनाची गुरुकिल्ली : प्रा. जितेंद्र वाघमारे
श्रीगोंदा दि.22 जून 2024
योग दिनानिमित्त व्यंकटेश पोद्दार लर्न स्कूलमध्ये सुमारे 350 विद्यार्थ्यांनी योग व प्राणायाम केले.
याप्रसंगी व्यंकटेश पोतदारलर्न स्कूलचे प्राचार्य व शिक्षक यांनी प्रास्ताविकात पाहुण्यांचे स्वागत करून सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य जितेंद्र वाघमारे सर यांनी आपल्या अमूल्य शब्दातून योगाचे विद्यार्थी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगताना शरीर व मन यांचे उत्तमं संतुलन ठेवून निरामय जीवनशैलीसाठी योग व प्राणायामावर आधारित प्राचीन भारतीय जीवनशैली ही सर्वोत्तम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अंगीकार केल्यास त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहून त्यांची एकाग्रता व बौद्धिक क्षमतेत देखील वाढ होते, असे प्रतिपादन केले.
योगशिक्षक प्रकाश धोत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरून विविध योग व प्राणायाम प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले. व इतर विद्यार्थ्यांनी त्याचे अनुकरण केले.
त्याचबरोबर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी परिपाठ घेतला याचप्रमाणे व्यंकटेश पोद्दार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे वाढदिवस त्याचबरोबर विविध प्रकारचे उपक्रम नेहमीच राबवले जातात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट-बिस्कीट ऐवजी वृक्षारोपणासारखा उपक्रम राबवला जातो.
ज्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्या दिवशी प्रा.वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विद्यार्थीच्या हस्ते कुठलेही एक वृक्षाचे रोप घेऊन शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले जाते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन प्राचार्य जितेंद्र वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच क्रीडा शिक्षक प्रकाश धोत्रे सर, प्रेम सर ,ओंकार सर, विजय इथापे यांनी मोलाचे सहकार्य केले. याचबरोबर आशा ताटे मँम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या सर्व उपक्रमाचे आ.स्कूल मॅनेजमेंटने विद्यार्थ्याचे मनापासून कौतुक केले.