ताज्या बातम्या"दादा या स्वयंघोषित 'दादा' होणाऱ्याचा बंदोबस्त करा", कार्यकर्त्याचे अजित पवारांना पत्र

“दादा या स्वयंघोषित ‘दादा’ होणाऱ्याचा बंदोबस्त करा”, कार्यकर्त्याचे अजित पवारांना पत्र

spot_img
spot_img

व्हय रं तू, दादाकडे कशाला आलायस, मी हाय की

बारामती दि 30 जून 2024

निंबुत नजिक खंडोबाचीवाडी (ता. बारामती) येथील किरण लकडे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट पत्र लिहीत गाऱ्हाणे मांडले आहे. सद्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

या पत्रामुळे बारामती तालुक्यात मोठी चर्चा होत आहे.

 

किरण लकडे यांनी अजित पवारांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, दादा, विकासकामांची दोर हातात घेऊन आपण युतीच्या सरकारमध्ये सामील झाला. आनंद वाटला. उपमुख्यमंत्री पदही मिळालं तेव्हाही आनंद वाटला.

 

त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला जेव्हा अर्थमंत्री पद दिलं गेलं. तेव्हासुध्दा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जसे आपल्या दुःखात सहभागी झालो/ अगदी तसंच आपल्या सुखातदेखील सहभागी झालो.

 

पुढे जाऊन लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा उठला, आपण केलेली विकासकामे सांगत त्याच्याच जोरावर मतदान मागितलं, पण भावनिकतेच्या लाटेपुढे विकासकामांनी जोर धरला नाही. पण मग आपल्या पराभवाला भावनिकतेचं नाव देऊन मोकळे झालो,

 

पण त्याच्यामागे असणारी इतर कारणांची आपण शहानिशा करणार आहोत की नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं अन जनतेचं खरं मत आपण विचारात घेणार आहोत की नाही, त्यावर चर्चा व्हायलाच हवी. कारण हे वास्तवदर्शी मत आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, हे ही नाकारून चालणार नाही.

 

दादा, आता तुम्ही विचाराल की ‘त्यांना कुणी अडवलंत?’ अहो त्यांनीच अडवलंय ज्यांना तुम्ही सहकारी संस्था, बँका, स्थानिक स्वराज्य संस्थांची पदं अन दुसऱ्या फळीतील नेतेपद अगदी खिरापत वाटल्यासारखी वाटून टाकलीत.अहो, ही नेतेमंडळी कधी गाडीची काच खाली घेत नाहीत. की कधी कुणाच्या सुख-दुःखात सहभागी होत नाहीत. अन मग अशा वागण्यानं त्यांचा गावातला जनसंपर्क कमी व्हायला असा किती वेळ लागतोय ओ.

 

तुम्ही दिलेल्या पदांचा वापर यांनी सर्वसामान्य लोकांसाठी नव्हे तर यांची घरं भरण्यात अन नातेवाईक आप्तेष्ट मंडळी मोठी करण्यासाठी केलाय. हे मी एकटाच नाही म्हणत, अगदी कुठल्याही गावात गेला तरी चारचौघात हीच चर्चा सुरूय अगदी खुल्लमखुल्ला !

 

खंडोबाच्यावाढीच्या या कार्यकर्त्यांन आपल्या भावना अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्या आहेत त्यांनी त्यांचे हे पत्र अजित पवार यांना ई मेलद्वारे पाठवले आहे. हेच पत्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

एका कार्यकर्त्यांन आपली मांडलेली ही व्यथा ही बारामती तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आणी सामान्य लोकांची व्यथा असल्यामुळे लोकांना हे पत्र आपलेसे वाटत आहे.

 

नेत्यांनी यांच्या पदाचा केलेला ‘भलताच’ वापर पण मग आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता आमचं काम घेऊन यांच्याकडे गेलाच तर त्या कामाला टोलवाटोलवीचं उत्तर देणं, वेळप्रसंगी धमकीवजा इशारा अन सूचना देणं हा यांचा उद्योग. यातूनही आम्ही यांना बगल देऊन आपल्या ‘सहयोग’ वर किंवा जनता दरबारात यायला निघालो की,

 

आलेच आडवे पाय घालायला अन आम्हाला परावलंबी होऊ न द्यायला… ‘आरं मी करतुकी तुझं काम, आता एवढ्‌यासाठी हिथं दादाकडं आलाय व्हय रं?’ असं म्हणून कित्येक पावलं आपल्या घरासमोरून अगदी भिकाऱ्याला हकालल्यागत हाकलून लावलेत. बरं मग यांच न ऐकून, माघारी नाही जाऊन आम्ही काय करायचं? शेवटी गावात आम्हाला रोज यांचीच तोंडं बघायचीत.

 

 

लेटेस्ट न्यूज़