ताज्या बातम्याएवढ्या चिमुकल्या वयात स्वामिनीला मिळाले याबद्दल सन्मानचिन्ह

एवढ्या चिमुकल्या वयात स्वामिनीला मिळाले याबद्दल सन्मानचिन्ह

spot_img
spot_img

तीन मुख्याध्यापिका यांच्या शुभहस्ते स्वामिनी विक्रांत पवार हिचा सन्मानचिन्ह देऊन गौरव…

बार्शी दि.11 जुलै 2024

व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने दिले जाणारे सन्मान चिन्ह आज रोजी सिल्व्हर ज्युबिली येथे स्वामिनी चे गुरुजन शिक्षकवर्ग म्हणून सिल्व्हर ज्यूबिली प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ.रनखांबे मॅडम, सरस्वतीच्या मुख्याध्यापिका सौ धुळम मॅडम, व सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ दिपाली गोरे मॅडम यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले यावेळी शिक्षक वर्ग गवळी मॅडम, जमदाडे मॅडम,कानडे मॅडम तळे मॅडम,वास्कर मॅडम, स्वामी मॅडम कळसकर मॅडम,चोपडे मॅडम,मुलानी मॅडम तसेच स्वामी सर,तेली सर उपस्थित होते.

यावेळी सर्व शिक्षकांनी स्वामिनीचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

(21 जुन रोजी व्हाईस ऑफ मीडिया बार्शी च्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्याचा सन्मान सोहळा आयोजित झाला होता, त्यावेळी स्वामिनी आजारी असल्याने त्याचा गौरव आज करण्यात आला.)

लेटेस्ट न्यूज़