ताज्या बातम्याकुकडीच्या पाण्यासाठी वळसे पाटलांच्या बैठकीला विरोध : घनश्याम शेलार

कुकडीच्या पाण्यासाठी वळसे पाटलांच्या बैठकीला विरोध : घनश्याम शेलार

spot_img
spot_img

कुकडीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार..?

श्रीगोंदा दि.12 जुलै 2024

आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब

विधिमंडळ पक्षनेते काँग्रेस

विधान भवन मुंबई 20

विषय :- कुकडी प्रकल्पातील पाणी आंबेगाव व जुन्नर तालुक्याकडे वळविण्यासाठी सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीला विरोध करणेबाबत

महोदय,

राज्याचे सहकार मंत्री व आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना दिनांक 25 जून रोजी पत्र देऊन कुकडी प्रकल्पाशी संबंधित काही विषयावर बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीत त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत ते सर्व विषय कुकडी डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या श्रीगोंदा, कर्जत व करमाळा तालुक्यातील कुकडी लाभधारक शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत त्यामुळे या बैठकीत त्यांनी मागणी केलेल्या विषयावर निर्णय होऊ नये यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह धरावा ही विनंती

 

त्यांनी दिलेले पत्र व त्यातील विषय व त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा कर्जत व करमाळा या तालुक्यावरती कसा अन्याय होतो याबाबतची माहिती आपणास देत आहे.

1) आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी त्यांनी 2.55 पीएमसी पाणी कुकडी प्रकल्पातून आरक्षित करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे.

ही मागणी पूर्णतः चुकीची आहे तर कुकडी प्रकल्पातील धरणे पूर्ण क्षमतेने भरले तरीही प्रत्येक वर्षी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यावर शेतीच्या पाण्यासाठी अन्याय होतो वळसे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे 2.55 टीएमसी पाणी दिल्यास श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांना पाणीच मिळणार नाही तर कर्जत व करमाळा तालुक्याला पाणी मिळण्याचा विषयच शिल्लक राहणार नाही

2 ) आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरातील शेतीसाठी उपसा सिंचन योजनेची मागणी त्यांनी केलेली आहे अशा चार उपसा सिंचन योजनेच्या मागण्याचा समावेश या मागणीत आहे .

त्यांची ही मागणी कुकडीच्या मूळ प्रकल्प अहवालाशी विसंगत असून उपलब्ध पाण्यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नाही त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा, कर्जत करमाळा तालुक्यातील कायम अन्याय होत आलेला आहे त्यामुळे त्यांची ही मागणी शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.

3 ) डिंबे ते माणिकडोह बोगदा रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे.

कुकडी डावा कालवा 259 किलोमीटर लांबीचा कालवा असून हा कालवा येडगाव धरणातून आहे येडगाव धरण हे केवळ 1944 एमसीएफटी क्षमतेचे धरण आहे म्हणजेच हे धरण दोन टीएमसी चे सुद्धा नाही कुकडी प्रकल्पातील अन्य धरणातून पाणी घेऊन या कालव्याद्वारे करमाळ्या पर्यंत पाणी देण्याची तरतूद प्रकल्प अहवालात आहे त्यापैकी डिंबे धरणातून सव्वा सहा टीएमसी पाणी घेण्याची तरतूद आहे मात्र हे सव्वा सहा टीएमसी पाणी आज पर्यंत कधीही येडगाव धरणात आले नाही व ते या टनेल शिवाय शक्यही नाही हाताने नसल्यामुळेच या कालव्यावरील श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यातील शेतकऱ्यावर नेहमीच अन्याय होतो तर डिंभे धरण 100% भरून त्याचे पाणी ओव्हरफ्लोने समुद्राला जाते डिंबे माणिकडोह बोगदा झाल्यास समुद्राला वाहून जाणारे पाणी हे कधीच न भरणाऱ्या माणिकडोह धरणात येऊ शकते व कुकडी डाव्या कालव्याचे हक्काची सव्वा सहा टीएमसी पाणी जळगाव धरणात येऊ शकते त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील डाव्या कालव्यावरील कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही म्हणून हा बोगदा होणे नितांत गरजेचे आहे.

 

सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी कुकडी प्रकल्पाबाबत केलेल्या वरील तीनही मागण्या ह्या श्रीगोंदा, कर्जत व करमाळा तालुक्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यावर घोर अन्याय करणाऱ्या आहेत कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरण कधीही पूर्ण क्षमतेने भरत नाही त्यामुळेच माणिकडोह धरण 100% भरावे डिंबे धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी समुद्राला जाण्याऐवजी या बोगद्या मधून ते माणिकडोह धरणात यावे यासाठी हा बोगदा होणे नितांत गरजेचे आहे मात्र वळसे पाटील साहेबांनी या बोगद्याच्या कामास कायमच विरोध केलेला आहे

तर त्यांनी नव्याने कुकडी प्रकल्पातील पाणी पुणे जिल्ह्याला वळवण्यासाठी अन्य दोन मागण्या केल्या आहेत वळसे पाटील साहेबांनी जी बैठक आयोजित करायला सांगितलेली आहे त्या बैठकीत जर त्यांच्या मागणीप्रमाणे सोयीचे निर्णय झाले तर भविष्यात कुकडी डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या श्रीगोंदा, कर्जत, पारनेर व करमाळा या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार नाही व हा भाग पूर्णपणे उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपणास माझी नम्र विनंती आपण वळसे पाटील साहेबांनी केलेल्या मागण्यांपैकी वरील तीनही मागण्या श्रीगोंदा, कर्जत पारनेर व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर घोर अन्याय करणाऱ्या असून त्यांच्या अयोग्य मागण्यास सक्त विरोध करण्यासाठी आपणाकडून मा. मुख्यमंत्री महोदय व सरकारकडे सक्त विरोध केला जावा व कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय न होता त्यांना दिलासा देण्यासाठी आपणाकडून आग्रही मागणी व्हावी ही नम्र विनंती

आपला विश्वासू 

(घन:शाम शेलार)

लेटेस्ट न्यूज़