राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण ; तरीही टोलनाका सुरू करण्याचा अट्टहास
श्रीगोंदा दि.15 जुलै 2024
जिल्ह्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 516 या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे तालुक्यात अंतिम टप्प्यात आले आहे.
उत्तर भारत ते दक्षिण भारताला जोडणाऱ्या या महामार्गाची नोंद राष्ट्रीय महामार्गात होणार आहे या भागातून बंगळुरूकडे शेतकऱ्यांना कांदा रवाना होतो त्यासाठी खूप वेळ लागत होता आता तो गतिमान होऊन वेळ वाचणार आहे महामार्गाने नक्कीच नगर सोलापूर या दोन जिल्ह्यांची देवाण-घेवाण वाढेल.
हाच महामार्ग अनेक छोट्या मोठ्या गावांमधून जात असल्याने त्या त्या गावांमधील ग्रामस्थांच्या व्यापाऱ्यांच्या समस्या समजून न घेता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ग्रामस्थांवर व्यापाऱ्यांवर दडपशाही करून महामार्गाची कामे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे.
असेच निकृष्ट दर्जाचे काम, सर्विस रोड व अपूर्ण उड्डाणपूल ही कामे अपूर्ण असतानाच NHAI कडून त्याच महामार्गावरील टोल नाका सुरू करण्याच्या हालचाली चालू आहेत. अशा अनेक अडचणी बनपिंप्री ग्रामस्थ व व्यापारी यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या तर प्राधिकरणाकडून या बनपिंपरी ग्रामस्थ व व्यापारी यांना पोलीस अधीक्षक साहेब. अहमदनगर यांचेकडे खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या देत आहेत. या दडपशाही विरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
महामार्गलगत गावांना सर्विस रोड व उड्डाणपूल बंधनकारक असताना व ती कामे अपूर्ण असताना महामार्ग प्रशासन टोल सुरू करण्याचा घाट घालत आहे.