ताज्या बातम्याश्रीगोंद्यात तरसाचा हल्ला, नागरिक मदतीला आल्याने आजोबा वाचले...

श्रीगोंद्यात तरसाचा हल्ला, नागरिक मदतीला आल्याने आजोबा वाचले…

spot_img
spot_img

मा. सचिन जगताप यांची वनविभागाकडे संरक्षणाची मागणी

श्रीगोंदा दि.18 जुलै 2024

श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथील रहिवासी चंपालालयल्लाप्पा कुऱ्हाडे यांच्या वस्तीवर सकाळी ८ वाजता दोन तरसाने जीवघेणा हल्ला केला असून ते त्यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत ही माहिती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने बनपिंप्री गावचे सरपंच गौतम पठारे यांना घटनास्थळी पाठवत घटनेची तातडीने माहिती घेण्यास सांगितली.

सरपंच गौतम पठारे व खांडगावचे सरपंच काकासाहेब ढवळे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहिले असता तरसाच्या हल्ल्यात कुऱ्हाडे  हे गंभीर जखमी झालेले दिसले त्यांनी तातडीने सचिन जगताप यांना माहिती दिली असता, जगताप यांनी त्यांना रुग्णालयात नेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय येथे आणून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे, त्यानंतर लगेच सचिन जगताप यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या कुऱ्हाडे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली .

नगरीपंचशी बोलताना जगताप म्हणाले की भर दिवसा नागरी वसाहतीमध्ये हिंसक प्राणी येऊन नागरिकांवर जीवघेणा हल्ला करत आहे, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चंपालाल कुऱ्हाडे यांचा जीव वाचला आहे नागरिकांनी देखील तरसावर हल्ला केल्यामुळे चंपालाल कुऱ्हाडे यांना सोडून दिले तरी देखील सुमारे तीनशे चारशे नागरिक असून देखील दोन तरस घाबरायला तयार नाहीत तरी वन विभागाने हिंसक प्राण्यांपासून नागरिकांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी वन विभागाकडे केली

लेटेस्ट न्यूज़