Friday, December 20, 2024

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांचा पूरग्रस्त भागात पाहणी दौरा…

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांचा पूरग्रस्त भागात पाहणी दौरा..

श्रीगोंदा दि.25 जुलै 2024

 

भीमा नदी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे भीमा नदीक्षेत्रातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भीमा नदीतील विसर्गामुळे आर्वी बेटाचा आर्वी गावाशी आज गुरुवार दि. २५/०७/२०२४ रोजी सकाळी संपर्क तुटला असल्याचे कळताच आमदार बबनरावजी पाचपुते यांनी तात्काळ तहसीलदार श्रीगोंदा यांना सूचित करून विक्रमसिंह पाचपुते यांना तेथील नागरिकांना धीर देण्यासाठी आर्वी बेटावर पाठवले.

श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी येथील बेटावर युवा नेते भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री विक्रमसिंह पाचपुते‌‌‌ व श्रीगोंदा तालुक्याच्या तहसीलदार सौ.क्षितिजा वाघमारे, सर्कल चौधरी साहेब, तलाठी सुद्रिक, पोटे व बळी भाऊसाहेब तसेच डॉ. राऊत व त्यांचे आरोग्य सेवक तसेच प्रशासकीय प्रमुख कर्मचारी यांनी प्रत्यक्ष नदी काठी जाऊन परीस्थितीचा आढावा घेतला. तसेच पुराच्या पाण्यामधून बोटीने जाऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्या मदतीसाठी दादांसह तालुका प्रशासन सज्ज असल्याचे युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी यावेळी सांगितले व बेटावरील लोकांना धीर दिला. यावेळी समवेत गोटू मगर, कुंडलिक नाना भोसले,रोहित गायकवाड, गणपतराव परकाळे, बबनराव गावडे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते…

 

आमदार पाचपुते यांचे मतदारसंघातील शेतकऱ्यांना पाणी साठविण्याचे आव्हान:-

कुकडी पाणलोट क्षेत्रासह मतदारसंघात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे कुकडी डाव्या कालव्यामधून आज ५०० क्युसेक्स ने पाणी सोडण्यात आले आहे लाभक्षेत्रात पावसाचा वेग वाढल्यास १००० क्युसेक्स ने पाणी सोडण्यात येईल. ओव्हरफ्लोचे पाण्याने विसापूर, सीना धरण, घोडेगाव, मोहोरवाडी, औटेवाडी, लेंडीनाला सह इतर प्रमुख तलाव तसेच लाभक्षेत्रातील बंधारे भरून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनी खाजगी शेततलाव देखिल आताच भरून ठेवावेत. म्हणजे पाणी टंचाईच्या वेळी हा साठा उपयुक्त ठरेल.

आणखी महत्वाच्या बातम्या