ताज्या बातम्याशिवशंभु सायकल असोसिएशनची 38 किमी ची सायकल राईड

शिवशंभु सायकल असोसिएशनची 38 किमी ची सायकल राईड

spot_img
spot_img

शिवशंभो सायकल असोसिएशनने “येथे” केले वृक्षारोपण

श्रीगोंदा दि.10 ऑगस्ट 2024

वृक्ष लाविले देवाच्या द्वारी

श्रीगोंदा तालुका दौड तालुका व शिवशंभु सायकल असोसिएशन ने श्रीगोंदा ते ढोरजे आयोजीत केलेल्या हर हर महादेव सायकल राईड मध्ये संकेत गांजुरे, भाऊसाहेब खेतमाळीस, डॉ. किरण ढवळे सर, दिपक साबळे सर यांनी 38 किमीची सायकल राईड केली.

 

तर दौंड येथील भाऊसाहेब वाघ सर पांडुरंग बिडगर संदीप वागसकर सुभाष धुमाळ कावेरी गुरसल संजय येडे उद्योजक विठठलराव जगदाळे सुरेश मराडे श्रीगोंद्यातून मिठू लंके गुरुजी गोपाळराव डांगे रेश्मा डांगे हौसराव भुजबळ चंद्रकांत कोंथिबीरे अमोल हिरवे प्रशांत तरटे हे यावेळी उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने सत्काराचा मान शिवशंभुच्या अध्यक्षांनी स्विकारला. फराळाची चोख व्यवस्था भाऊसाहेब खेतमाळीस यांनी केली.

विशेष म्हणजे 38 किलो मीटरचे अंतर पार करत या सायकल असोसिएशन न थकता देवस्थानच्या प्रांगणात वृक्षारोपण केले .

 

पुढील राईड चे नियोजन तालुक्यातील हिरडगाव येथे सोमवार दि 12 ऑगस्ट रोजी असे होणार असल्याची माहिती शिवशंभु सायकल असोसिएशन दिली आहे. यावेळी शिवशंभु सायकल असोसिएशन श्रीगोंदा ते हिरडगाव 13 कि मी. अंतर पार करणार आहे.

लेटेस्ट न्यूज़