रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : नागवडे
श्रीगोंदा दि.23 ऑगस्ट 2024
श्रीगोंदा: सौ. अनुराधा नागवडे विचार मंच व छत्रपती शिवाजी महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते त्यातून श्रीगोंद्यातील तब्बल १०१ मुलींना आयफोन कंपनीत नोकरी मिळाली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत नागवडे यांनी दिली आहे.
काल दि २२ रोजी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना राजेंद्र नागवडे यांनी सांगितले की अनुराधा नागवडे विचार मंच आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्ट्याच्या माध्यमातून नोकरीमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी बंगलोर येथील आय फोन कंपनीत १०१ मुलींना नोकरीची संधीमिळाली आहे त्यातून त्याची राहण्याची खाण्याची सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे त्याचा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अनुराधा नागवडे विचार मंच आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने करियर कट्ट्याचे माध्यमातून पूर्व मुलाखत ट्रेनींग आणि भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन ३०/८/२०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नामांकित कंपन्या सहभागघेणार आहेत.
त्या मध्ये क्किस कापर्पोरेशन लिमिटेड, कॅलिबर सर्व्हिसेस लिमिटेड, जिनियस सर्व्हिसेस लिमिटेड, क्यू कनेक्ट लिमिटेड, दुगाई एच आर सर्व्हिसेस, फिन ड्राईव्ह प्रायव्हेट लिमिटेड, आर्मेका प्रायव्हेट लिमिटेड, अल्ट्रास्ट लिमिटेड, सॉफ्टर्जन लिमिटेड, एचडीएफसी बैंक, स्टेटबँक ऑफ इंडिया, ऍक्सिस बैंक, आवास फायनान्स लिमिटेड, टेक महिंद्रा, डब्लू एन एस लिमिटेड, इन्फोसिसलिमिटेड, माइट्रो रियल टेक, आय प्रोसेस लिमिटेड यासह अनेक कंपन्या सहभागी होणार असून पुणे मधील पिंपरी चिंचवड, शिवाजीनगर, पुणे स्टेशन परिसर, विमान नगर, मगरपट्टा, बंड गार्डन, येरवडा आदी ठिकाणी नोकऱ्या दिल्या जाणार आहेत यासाठी बीए/बीकॉम, बीएस्सी, बीसीए, बीसीएस, डिप्लोमा, बीई, एमए, एमकॉम, एमएसी विद्यार्थी सामील होऊ शकतात त्यासाठी विद्यार्थ्यांनी क्यू आर कोडच्या माध्यमातून फॉर्म भरून सहभाग नोंदवावा असे आवाहन अनुराधा नागवडे विचारमंच याच्या वतीने करण्यात आले असून या पत्रकार परिषदेत नागवडे कारखान्याचे चेरमन राजेंद्र नागवडे, संचालक बंडू जगताप, सुरेश रसाळ, सुभाष शिंदे, योगेश भोईटे, संदीप औटी, भाऊसाहेब नेटके, मारुती पाचपुते, दत्तात्रय काकडे, नीलकंठ जंगले, भाऊसाहेब बरकडे, विजय मूथ्या, विश्वनाथ गिरमकर यासह प्रा.सतीशचंद्र सूर्यवंशी व शिक्षक कर्मचारी वृंद हजर होते.