ताज्या बातम्याकोतकरांचंच ठरलं, केडगावकरांचा प्लॅन 'बी' ऍक्टिव्ह..?

कोतकरांचंच ठरलं, केडगावकरांचा प्लॅन ‘बी’ ऍक्टिव्ह..?

spot_img
spot_img

नगरच्या राजकारणातलं समीकरण बदलणार, हक्काचा माणूस ‘संदीपदादा’ सुरूंग लावणार..!

अहिल्यानगर दि.23 ऑक्टोबर 2024

सोयऱ्या- धायऱ्यांच्या सोयीच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात अनेकदा हेच सोयरेधायरे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पहायला मिळते. असाच प्रकार यावेळी नगर शहर विधानसभा मतदासंघात पहायला मिळू लागला आहे. अजितदादा गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना आता त्यांचे साडू माजी महापौर संदीप कोतकर यांनीच आव्हान दिले आहे. काहीही झाले तरी यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे कोतकर यांनी म्हटले आहे. जगताप आणि कोतकर दोघेही भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत.

माजी महापौर संदीप कोतकर हे गेली अनेक दिवसांपासून त्यांच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे नगरवासीयांशी हितगुज करू शकले नाहीत. परंतु आता वेळ आलीय बोलायची, संघर्षाची व एकजुटीची. नगर शहर विकसित व्हावं, शहराचे रुपडे बदलावं हे स्वप्न त्यांनी पाहिलं. महापौर पदाच्या काळात केडगाववासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, केडगाव पाणी पुरवठा योजना, शहर पाणी योजना, शहरातील रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात नगरकरांच्या पाठबळामुळेच काही प्रमाणात का होईना यश आले.

 

अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहेत. तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांची सुरक्षितता, शिक्षणासाठी सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, उच्च शिक्षण, एमआयडीसी, उद्योगधंदे यावर काम करणं आवश्यक आहे. संदीप कोतकर यांनी नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खूणगाठ बांधलीय. पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीस मागे पडलंय. पण आपल्या नगर शहराला पुणे, नाशिकच्या बरोबरीने का होईना पुढे न्यायचेय, ही मनोमन इच्छा त्यांची आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी विकासाचं विजन ठरवून विधानसभेचे रणसिंग फुंकलं.

 

माजी महापौर संदीप कोतकर किंवा त्यांच्या सौभाग्यवती माजी उपमहापौर सुवर्णाताई कोतकर यांनी नगर शहर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्का केला आहे. त्यांच्या कामांचा आलेख पाहता महाविकास आघाडी कडून उमेदवारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे कळतंय. नगर मतदारसंघातून उबाठा, कॉँग्रेसमध्येही इच्छूक आहेत. दोन्ही पक्ष जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील सुद्धा होते. पण महाविकास आघाडीकडून कोतकर यांच्यासारखा सक्षम उमेदवारच जगतापांना तगडी फाईट देऊ शकतो हे मात्र नक्की. राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशासाठी कोतकर यांची तयारी झालेली असून फक्त पवार साहेबांच्या आदेशाची वाट पाहत असावेत.

राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षात उमेदवाराची चाचणी सुरू असताना नगरच्या जागेवर शरद पवारांनी दावा केल्याची माहिती आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या आ.संग्राम जगताप यांच्याशी लढत द्यायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला तर महाविकास आघाडीतून संदीप कोतकर यांच्यासारखाच चेहरा हवा अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती आहे.

संदीप कोतकर यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. परंतु जीवनात प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपल्या व्यवसायात त्यांनी यश मिळवलेच पण त्याचबरोबर नगर शहराच्या विकासाचा त्यांनी कधी ध्यास सोडला नाही. ज्या नगरकरांनी आपल्यावर विश्वास टाकला त्या नगरकरांचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून संदीपदादा कोतकर, सचिनदादा कोतकर, सुवर्णाताई कोतकर यांचा सतत जनसामान्यांशी संपर्क राहिला . अडचणीच्या काळातही सर्वसामान्यांना मदत करणे त्यांनी सोडले नाही.एवढेच नाही तर हॉटेल व्यवसायातून अनेक तरुणांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. आणि आता स्वप्नातील अहिल्यानगर आणि आपल्या वैयक्तिक अडचणींमुळे नगरचा राहिलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्यांनी आता नगर विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.

सध्या शहरातील सत्ता राजकारण ज्या कोणा भोवती केंद्रित असेल तर ती गणिते बदलतील तसे लोक म्हणत आहेत, दादांची नगरच्या राजकारणात एन्ट्री झाली तर नक्की जनतेचा ओढा दादांकडे येईल असे संदीप कोतकर यांचे कार्यकर्ते सांगतात.शहरात सुरुवातीपासूनच संदीप दादा कोतकर यांची लोकप्रियता आहे. त्यांची लोकप्रियता व त्यांचे वडील भानुदास कोतकर यांचे राजकीय ध्येय धोरणे यामुळे राजकारणातील समीकरणे बदलली आहेत. आता नगर विधानसभेत महाविकास आघाडी कडून ही जागा कोतकर कुटुंबातंच येणार हे मात्र जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय.

लेटेस्ट न्यूज़