Saturday, December 21, 2024

‘उद्या’ सौ.अनुराधा राजेंद्र नागवडे भरणार उमेदवारी अर्ज

मोठे शक्ती प्रदर्शन करत, मान्यवरांच्या उपस्थितीत सौ. नागवडे भरणार उमेदवारी अर्ज 

श्रीगोंदा दि.27 ऑक्टोबर 2024

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि जनसामान्यांचा आवाज बनलेले नागवडे कुटुंब व स्वर्गीय शिवाजी बापू नागवडे यांच्या स्नुषा सौ.अनुराधा राजेंद्र नागवडे या सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सौ.अनुराधा नागवडे यांना अधिकृत उमेदवारी घोषित घोषित करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गेल्या पाच वर्षात नागवडे कुटुंबांनी मतदारसंघात अनेक लोकाभिमुख , प्रगतशील आणि दूरदृष्टी पूर्ण विकास कामे केली आहेत. सहकार क्षेत्रात दिलेला शब्द पूर्ण करत त्यांनी आपला शब्द पाळला आहे. कारखानदारीमुळे शेतकरी वर्गाशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे, ध्येयवेडे आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. जनसामान्यांसाठी झगडणाऱ्या स्वाभिमानाने लोकांसाठी लढणाऱ्या अशी ओळख सौ. नागवडे यांची आहे.

मतदारसंघाच्या कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

जनतेचा अपार विश्वास आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या अनुराधा नागवडे यांच्याकडे मतदार संघाच्या उद्याचा आमदार म्हणून पाहिले जाते. विकासाचे ध्येय आणि जनतेची निष्ठा जोपासणाऱ्या या महिला नेतृत्वाच्या पाठीशी पुन्हा एकदा श्रीगोंदा मतदारसंघ एकवटला आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणी कशावर ही नेण्याचा प्रयत्न केला तरी ही निवडणूक “बदल हवा चेहरा नवा”याच मुद्द्यावर होणार आहे.

सौ. नागवडे उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी श्रीगोंदा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान नागवडे कुटुंबाने केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या