नगरसेवक संदीप गायकवाड, राजेवाडीचे भाजपचे बुथप्रमुख पै.नामदेव कुमटकर, भवरवाडीतील प्रेमराज पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती तुतारी,
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश…
जामखेड-दि.4 नोव्हेंबर 2024
जामखेडमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले असून आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जामखेड शहर, राजेवाडी आणि भवरवाडी येथील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांनी आणि असंख्य कार्यकर्ते, युवांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
काल जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार यांनी उपस्थित राहून विविध सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते, मित्रपरिवार, महिला भगिनी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जामखेडमधील विद्यमान नगरसेवक संदिप गायकवाड, आंबादास पवार, अरुण फुलमाळी तर राजेवाडी येथील भाजपचे बुथप्रमुख पै.नामदेव कुमटकर यांच्या व भवरवाडी येथील प्रेमराज पवार, नवनाथ पवार यांच्यासह जामखेडमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, बुथ कार्यकर्ते आणि असंख्य युवांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली तुतारी हाती घेतली. हा आमदार राम शिंदेंना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत सध्या मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धडाका सुरु असून राम शिंदे य़ांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन भाजप पदाधिकारी राजीनामा देऊन पवार साहेबांची तुतारी हाती घेत आहेत. गेल्या पाच वर्षात आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांनी प्रेरित होऊन कर्जत जामखेडमधील स्वाभिमानी युवा, कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असून रोहित पवार हे त्यांच्या विजयाचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाहीत अशीच चर्चा मतदारसंघातील सर्व सामान्य लोकांमध्ये आहे.
आमदार रोहित पवार यांनी भाजपमधून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जामखेडमधील स्थानिक पदाधिकारी, स्वाभिमानी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.