Friday, December 20, 2024

पारनेरमध्ये मा.नगराध्यक्ष औटींना सर्वाधिक पसंती…

दहशत संपवण्यासाठी विजु औटी निवडणुकीच्या रिंगणात 

पारनेर दि.6 नोव्हेंबर 2024

पारनेर विधानसभा निवडणुकीत सध्या माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना सर्वाधिक पसंती मिळत असून त्यांच्या प्रचार रॅलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती व महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदल्याने सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. जे ऐनवेळी उमेदवार बदलतात ते तालुक्याचा काय विकास करतील, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महायुतीकडून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु सुरवातीपासूनच विजु औटी यांना उमेदवारी द्यावी यासाठी सर्वजण आग्रही होते. परंतु औटी यांना उमेदवारी न दिल्याने सर्व सामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तशीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये झालेली आहे. सुरवातीपासूनच शिवसेना (उबाठा) गटाचे संदेश कार्ले हे उमेदवारीसाठी दावेदार असताना ऐनवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली.

खासदारकी साठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतुन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे लंके कुटुंब निष्ठावंतांच्या मुळावर उठले अशी चर्चा तालुक्यात आहे. तिकिटासाठी त्यांचा पक्ष बदलायाचा प्रवास सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे. तिकिटासाठी जर हे एवढ्या लवकर पक्ष बदलत असतील तर

सर्वसामान्यांसाठी विकास कामे एव्हढे प्राधान्याने करतील का असा थेट सवाल आता केला जात आहे. त्यांच्या वारंवार खोट्या आश्वासनाला सर्वसच वैतागलेले आहेत अशा चर्चा मतदारसंंघा आहेत त्यामुळे मतदारांमधून त्यांच्याविषयी थेट नाराजी व्यक्त केलेली जात आहे.

सध्या लंके यांना मतदारांमधून नाराकारले जात असल्याचे दिसून येत आहे. समाज माध्यमावर लंकेंच्या पोस्टला निगेटिव्ह कमेंट पडत असल्याने निवडणुकीत या उमेदवाराला अनंत अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारी केलेल्या मा. नगराध्यक्ष विजु औटी यांना तरुण, ज्येष्ठ, महिला,सर्वसामान्य नागरिक,यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचा सध्या मतदारसंघात दौरा सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या