Friday, December 20, 2024

काय… राम शिंदेंनी सरकारी ॲम्बुलन्सलाच बनवली प्रचाराची गाडी

आ.रोहित पवार यांच्या पाच वर्षातील आरोग्यसेवेने भाजपची घाबरगुंडी

कर्जत-जामखेड दि.8 नोव्हेंबर 2024

आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या काळात कर्जत जामखेड मतदारसंघात तीन कोवीड सेंटर सुरु केले होते. या कोवीड सेंटरमध्ये जवळपास ३० हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. रोहित पवार यांनी मतदारसंघात ऑक्सिजन निर्मिती आणि ऑक्सिजन टँक उभारले. गेली पाच वर्ष आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात लोकांना घरोघरी जाऊन उपचार करण्यासाठी ८ अँब्युलन्स चालवण्यात येतात. गेल्या चार वर्षात गावोगावी, वाड्या-वस्तीवर जाऊन या अँब्युलन्सच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास दीड लाखाहून अधिक जणांवर मोफत उपचार करण्यात आले. रोहित पवार यांनी मतदारसंघात कर्जत, जामखेड आणि मिरजगाव असे तीन उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले आणि त्यासाठी १०० कोटींपेक्षा निधीही आणला आणि आरोग्यक्षेत्रात त्यांनी केलेली कामे ही प्रत्येक घरापर्यंत पोहचल्याने विरोधी आमदार राम शिंदे निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा आणि पंतप्रधानांचा फोट असलेली शासकीय अँब्युलन्स केवळ मतासाठी मतदारसंघात फिरवत आहेत. विशेष म्हणजे या कृत्यावर निवडणुक आयोग कोणतीही कारवाई करत नाही याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या अँब्युलन्सवर कोणतेही नाव नाही, चिन्ह नाही तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचे पाप केलं. रुग्णांना गोळ्या, औषधे वाटप करणाऱ्या अँब्युलन्समध्ये काहीही आक्षेपार्ह नसताना पोलीस प्रशासनाने कारवाई केली. सत्तेचा गैरफायदा कसा घेतला जातो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या पाच वर्षापासून सुरु असलेल्या अँब्यलन्स निवडणुकीच्या काळात बंद करण्याचा घाट हे राम शिंदे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून घालत आहेत . कोविड काळात खरी गरज असताना मात्र घरात बसणारे आणि फक्त स्वतःच्या बंगल्यासमोरील बगीच्याला पाणी देण्यासाठी बाहेर येणारे राम शिंदे यांना आज निवडणुकीमुळे कर्जत जामखेडकरांचा पुळका आलाय. स्वतःचा आणि पंतप्रधानांचा फोटो असलेली सरकारी अँब्युलन्स निवडणुकीच्या काळात केवळ राजकीय फायद्यासाठी फिरवत असले तरी त्यांची ही चमकोगीरी कर्जत जाखेडकरांना चांगलीच माहित असल्याने आणि कर्जत जामखेडकरांची खरी सेवा ही आमदार रोहित पवार यांनी केल्याने त्यांचा विजय हा निश्चित आहे, यामुळेच घाबरलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांने रोहित पवार यांच्या सुरु असलेल्या आणि कुठलेही फोटो नसलेली अँब्युलन्स जाणीवपूर्वक पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, हा केवळ आणि केवळ सत्तेचा गैरवापर आहे यावरून कर्जत-जामखेड मतदारसंघात विजय कोणाचा होणार हेही स्पष्ट होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या