संभाजी ब्रिगेडचा आमदार रोहित पवार यांना जाहीर पाठिंबा
कर्जत जामखेड दि.11नोव्हेबर 2024
संभाजी ब्रिगेडने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकासआघाडीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रोहित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे अहिल्यानगरचे उपजिल्हाध्यक्ष महादेव जाधव, कर्जत तालुकाध्यक्ष नवनाथ धनवे यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला .यावेळी संभाजी ब्रिगेडचे राशीन शहर अध्यक्ष मुन्नाभाई मुंडे, मयूर धनवडे, संतोष डोरले, प्रशांत कानगुडे, महादेव सपाटे, नाथा पवार, गोरख लोहार, योगेश गायकवाड, महेश लोहार, गणेश गवळी, ऋषीकेश जाधव, महेश काळे, विनोद टाक आणि केतन वाघ हे उपस्थित होते.