बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी व संचालक मंडळाविरोधात आरोप आणि बदनामीकारक वक्तव्ये करण्यास कोर्टाचा मनाई आद
कर्जत,जामखेड दि.17 नोव्हेंबर 2024
खोटेनाटे आरोप व आत्मदहनच्या धमक्यांबद्दल ‘बारामती ॲग्रो कंपनी’ने बारामती न्यायालयामध्ये 10 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा आणि संबंधित लोकांना बारामती ॲग्रो कंपनी व संचालक मंडळाविरुद्ध (आ.रोहित पवार) बदनामीकारक मजकूर तयार करणे आणि प्रसारित करणे याविरोधात मनाई मिळण्यासाठी दावा दाखल केला आहे.
यामध्ये संपूर्ण दाखल कागदपत्रांचे, व्हिडीओ क्लिपचे, आत्मदहनाच्या धमक्याचे आणि न्यायालयीन निकालांचे अवलोकन केले असता विरोधकांचे सर्व आरोप हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कंपनीची आणि कंपनीच्या संचालकांची होणारी बदनामी थांबवण्यासाठी कंपनीने मे. न्यायालयाकडे एकतर्फी मनाई मिळणेकामी विनंती अर्ज केला आहे.
यामध्ये सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता बारामती न्यायालयाने बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी व संचालक मंडळांच्या विरोधात दि. २५/११/२०२४ पर्यंत कोणतेही खोटेनाटे आरोप करणे, बदनामीकारक मजकूर तयार करणे, तो प्रसारित करणे आणि जाहीर करणे याबाबत मनाई आदेश पारित केलेला आहे. सदर प्रकरणामध्ये बारामती ॲग्रो कंपनीच्या वतीने अँड. प्रसाद खारतुडे यांनी काम पाहिले.
कोट
“न्यायालयाच्या मनाई आदेशाचे पालन न केल्यास, संबंधितांविरुद्ध कोर्ट आदेश अवमान याचिकाही दाखल करण्याच्या तयारीत आम्ही आहोत.”
– ॲड. प्रसाद खारतुडे