दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष
श्रीगोंदा : दि 15 डिसेंबर 2024
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या जयघोषासह पुष्पवृष्टी, शंखाचा निनाद करत श्रीगोंद्यातील पंचायत समिती येथील श्री दत्त मंदिरात शनिवारी (दि. १४) सायंकाळी सहा वाजता दत्त जन्म सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
शनिवारी सायंकाळी सहा वाजता दत्त जन्म सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम अण्णा शेलार, आनंदकर स्पोर्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा मा. संजय आनंदकर सर यांच्या हस्ते दत्त मूर्तीचे पूजन करण्यात आले.
मंदिरासमोर पुष्पांनी सजविलेल्या व्यासपीठावरील पाळण्यामध्ये दत्त मूर्ती ठेवली होती. पूजन झाल्यानंतर वेदमंत्राचा जयघोष, पुष्पवृष्टी करीत भगवान दत्त जन्मोत्सवसाजरा करण्यात आला. यावेळी गुरुवर्य संजय आनंदकर सर यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली. श्रीगोंद्यातील महिलांनी दत्त जन्माचा पाळणा म्हटला.
यावेळी दत्त जन्मोत्सव समितीचे सदस्य, श्रीगोंदा पंचायत समितीचे कर्मचारी वृंद,आनंदकर स्पोर्ट अकॅडमीच्या आजी माजी विद्यार्थ्यांसह वृद्धेश्वर बँकेचे कर्मचारी वृंद, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लापसी-सांबरभात यांचा महाप्रसाद
प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन वृद्धेश्वर बँकेच्या माध्यमातून श्री विठ्ठलराव वाडगे भाऊसाहेब यांच्या वतीने करण्यात आले होते. पंचायत समिती परिसरातील मैदानात लापसी- सांबर,भात, जिलेबी या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याही वर्षी मोठ्या संख्येने भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.